बीबीदारफळ, पाकणी, वाळूज, मैंदर्गी, कर्देहळ्ळीमध्ये आढळले कोरोना बाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:43 IST2020-06-23T16:42:47+5:302020-06-23T16:43:56+5:30
ग्रामीण भागात नव्याने आढळले ११ कोरोना बाधित रूग्ण; ग्रामीण भागातील रुग्णसंख्या पोहोचली २१५ वर; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू

बीबीदारफळ, पाकणी, वाळूज, मैंदर्गी, कर्देहळ्ळीमध्ये आढळले कोरोना बाधित रूग्ण
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा अकरा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत़ यात ४ पुरूष तर ७ महिलांचासमावेश आहे़ दरम्यान, मंगळवारी ग्रामीण भागात एकाही कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोनाची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये उत्तर सोलापूर : २, अक्कलकोट : ३, दक्षिण सोलापूर : ३, मोहोळ: ३ अशा ११ रुग्णाचा समावेश आहे.
मंगळवारी ९५ अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी ८४ अहवाल निगेटिव्ह तर ११ अहवाल पॉझिटिव्ह आले़ आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ८६९ रूग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यापैकी २ हजार ८३४ अहवाल प्राप्त झाले त्यात २ हजार ६२० निगेटिव्ह तर २१४ पॉझिटिव्ह आले आहेत.
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात पाकणी (ता. उत्तर सोलापूर) ०१, बीबीदारफळ (ता़ उ़ सोलापूर) ०१, बुधवार पेठ, अक्कलकोट ०२, मैंदर्गी (ता. अक्कलकोट) ०१, बोरामणी (ता. द. सोलापूर) ०१, कर्देहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) ०२, क्रांतीनगर (ता. मोहोळ) २, वाळूज (ता. मोहोळ) ०१ असे ११ रूग्ण कोरोना बाधित झाले आहेत.