शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

कोरोनामुक्त झालेल्या सोलापूरकरांना ‘फ्रायब्रोसिस’ आजाराचा त्रास कमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 12:59 IST

पोस्ट कोविड ओपीडी : १४० पैकी दोघांनाच फायब्रोसिसची समस्या

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : कोरोना आजारात रुग्णांमध्ये  फुफ्फुसाचा संसर्ग दिसून येतो. आजारातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना फ्रायब्रोसिसचा त्रास होतो. मात्र, सोलापुरात खूप कमी जणांना असा त्रास झाल्याचे दिसून येत आहे. 

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला न्यूमोनिया झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये फ्रायब्रोसिसचा त्रास सुरू झाल्याचे आढळून येत आहे. या रुग्णांच्या रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आल्याचे तज्ज्ञ सांगतात. फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑक्साइड यांच्या अवागमनाची प्रक्रिया सुरू असते. त्यामध्ये त्रास व्हायला लागतो.

या रुग्णांना श्वास घेताना त्रास होणे, धाप लागणे, खोकला येणे, थकवा जाणवणे यांसह श्वसनाचा त्रास होतो.  कोरोनाकाळात न्यूमोनिया असलेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाच्या उतींना क्षती पोहोचते. त्या ठिकाणी जाड व कठीण उतींमुळे फुफ्फुसाचे कार्य मंदावते. या काळात कोरडा खोकला, थकवा, अचानक वजन कमी होणे, नैराश्य यांसह काही लक्षणे व्यक्तीनुसार बदलत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये अशा रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येत आहे. खूप कमी सोलापूरकरांना फ्रायब्रोसिसचा त्रास होत असल्याचे येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

१४० जणांनी केली पोस्ट काेविड सेंटर तपासणीछत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ओपीडीमध्ये आत्तापर्यंत १४० जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी फक्त दोन रुग्णांना फ्रायब्रोसीसचा त्रास झाला असून, त्यांची प्रकृती चांगली आहे.

पुुन्हा कोरोनाची लक्षणे आढळल्यास?  

  • - पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • - ताप येणे, शौचाला सारखे जावे लागणे, कोरडा खोकला, तोंडाची चव जाणे या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे.
  • - पहिल्या पाच दिवसात लक्षणे आढळतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लगेच पोस्ट कोविड ओपीडी जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कोरोना रुग्ण बरा होऊन जात असताना त्याची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येते. या तपासणीत फ्रायब्रोसिसचा संसर्ग असल्याचे कळते. काही रुग्णात उशिरा लक्षणे आढळू शकतात. आम्ही या रुग्णांच्या  संपर्कात असतो.  सोलापुरातील खूप कमी रुग्णांना हा त्रास असून, इतरांची तब्बेत ठणठणीत आहे.  - डॉ. लतीफ शेख, पोस्ट कोविड ओपीडी

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMedicalवैद्यकीय