कोरोना महामारी थंडावली; मोहोळमध्ये वसुली मोहीम सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:37 IST2020-12-16T04:37:30+5:302020-12-16T04:37:30+5:30

या वसुली पथकामध्ये नगर परिषदेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चार पथके करण्यात आली असून, त्यांना दैनंदिन वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...

Corona epidemic cold; Recovery campaign active in Mohol | कोरोना महामारी थंडावली; मोहोळमध्ये वसुली मोहीम सक्रिय

कोरोना महामारी थंडावली; मोहोळमध्ये वसुली मोहीम सक्रिय

या वसुली पथकामध्ये नगर परिषदेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चार पथके करण्यात आली असून, त्यांना दैनंदिन वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी मोहोळ शहरातील नागरिकांना आवाहन केले की, शहरातील प्रत्येक करदात्याने जबाबदारीने आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरून नगर परिषदेस सहकार्य करावे अन्यथा नगर परिषदेमार्फत येत्या काळात नगर पंचायत अधिनियम १९६५ मधील कलम १५२ ते १५५ अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रभारी मुख्याधिकारी डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले. मोहिमेत पथक प्रमुख म्हणून प्रियांका चव्हाण, योगेश खराडकर, राजकुमार सपाटे, सुवर्णा हाके, रोहित कांबळे, अक्षय खटके, अमित लोमटे आदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

------

Web Title: Corona epidemic cold; Recovery campaign active in Mohol