शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’तही नातं अतूट; बहिणींच्या राख्या ‘ऑनलाइन ’द्वारे भावांच्या मनगटी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:49 IST

 एका क्लिकवर मिळते राखी; पोस्टाला मिळतोय अल्प प्रतिसाद

ठळक मुद्देगेल्या वर्षी शहरातून पोस्टामार्फत एक लाख पन्नास हजार राख्या पाठविण्यात आल्या होत्यादुसºया शहरातून सोलापुरात वितरित करण्यासाठी एक लाख तीस हजार राख्या आल्या होत्यासोशल मीडियावरील काही वेबसाईट आहेत. अशा वेबसाईटवर बहिणींना राख्या खरेदीवर सवलत देण्यात आली

सोलापूर : दूरवर राहणाºया बहिणीनं पाठवलेली राखी... ती हातात बांधताना तिच्या आपुलकीचे स्मरण होते. कोरोनाचे संकट असतानाही अशा बहिणी ऑनलाइन चा पर्याय निवडत राख्या पाठवत आहेत. ती दूरवर असलेल्या सासरी राहत असली तरी कोरोनाच्या संकटातही नातं टिकवून आहे. पोस्टाच्या माध्यमातून राख्या पाठवण्यास अल्प प्रतिसाद पाहावयास मिळत आहे. 

गेल्या वर्षी शहरातून पोस्टामार्फत एक लाख पन्नास हजार राख्या पाठविण्यात आल्या होत्या तर दुसºया शहरातून सोलापुरात वितरित करण्यासाठी एक लाख तीस हजार राख्या आल्या होत्या, तर खासगी कुरिअरमार्फत तीन लाख राख्या पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा त्याकडे फारसा कल नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पोस्ट अन् खासगी कुरिअर कंपनीच्या सेवांवर परिणाम झाला आहे. सोशल मीडियावरील काही वेबसाईट आहेत. अशा वेबसाईटवर बहिणींना राख्या खरेदीवर सवलत देण्यात आली आहे. तुमचा भाऊ कितीही दूर अंतरावर राहत असल्यास त्याला ऑनलाइनद्वारे पाठवलेली राखी काही तासांच्या आतमध्ये भावाला मिळते. त्यासाठी तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही. अगदी एका क्लिकवर राखी मिळत आहे. राख्या हव्या त्या पत्त्यावर पाठवता येते. भावाने राखी बांधून घेतल्यानंतर त्याचीही आॅनलाईन भेट बहिणीला आॅनलाईनद्वारेच मिळते.

अशा आहेत ऑनलाइन  राख्या...कोरोनाचे संकट असलं तरीही यंदा देखील राख्यांच्या ट्रेंड्समध्ये वैविध्य पाहायला मिळत आहे. फॅन्सी, मोती, शिंपले, मोती, रुद्राक्ष, लॉकेट, भावाच्या फोटोसह, नावासह कस्टमाईज्ड राख्या ‘कूल ब्रो’, फूड राखी, ऑनलाइन  गेम्स वेडे, प्लांटेबल सीड राख्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. राखीची लांबी काय, राखीवर कोणती कलाकृती साकारण्यात आली आहे, हे पाहता येईल.

डाक विभागाचे खास पाकीट रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी डाक विभागही सरसावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राख्यांसाठी खास पाकिटे उपलब्ध करून देणाºया डाक विभागाने यंदाच्या पाकिटाचा आकार वाढविला असून, त्यावर ‘राखी पाकीट’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

दरवर्षी एक महिना अगोदरपासून राखी पाठवण्यात येतात, गेल्या वर्षी आम्ही साडेतीन लाख राख्या पाठवल्या होत्या, यंदा कोरोनामुळे राखी पाठवण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. दहा दिवस संचारबंदी असल्यामुळे राखी पाठविण्यावर जास्त परिणाम झाला आहे.-रतन अमाने, खासगी कुरिअर.

टॅग्स :SolapurसोलापूरRakhiराखीRaksha Bandhanरक्षाबंधन