नेतृत्वाने सांगितल्यास भारतात कोठेही लढण्याची तयारी : सहकारमंत्री सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:39 IST2018-10-27T14:38:09+5:302018-10-27T14:39:27+5:30
कुर्डूवाडी : नेतृत्वाने सांगितल्यास भारतात कोठेही निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे व थांबण्याचीही तयारी आहे. नेतृत्वाचा आदेश अंतिम मानून ...

नेतृत्वाने सांगितल्यास भारतात कोठेही लढण्याची तयारी : सहकारमंत्री सुभाष देशमुख
कुर्डूवाडी : नेतृत्वाने सांगितल्यास भारतात कोठेही निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे व थांबण्याचीही तयारी आहे. नेतृत्वाचा आदेश अंतिम मानून कार्यरत राहणार असल्याचे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात व तालुक्यात कार्यकारिणी नेमण्याविषयी पदाधिकाºयांच्या आग्रहाखातर सोलापूर जिल्ह्यात माढा, करमाळा तालुक्याचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान कुर्डूवाडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याचा वर्कलोड व मनुष्यबळ वाढावे, यासाठी कारखाना प्रबंधक संजय साळवे यांनी देशमुख यांची भेट घेऊन कारखान्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यानंतर देशमुख यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचे स्वीय सहायक प्रवीण गेडाम यांना फोनवरून संपर्क साधून कुर्डूवाडी वर्कशॉपसाठी वर्कलोडची मागणी केली. याला सकारात्मक संकेत मिळाल्याचे देशमुख यांनी सांगितले.
कोर्टासाठीची जागा, ९१७ मालमत्ताधारकांचा विषय, अपर तहसील कार्यालय कुर्डूवाडी शहरात व्हावे, मंजूर असलेल्या व निधीच्या प्रतीक्षेत असलेले ट्रॉमा केअर सेंटर याबाबत भाजपचे तालुका सरचिटणीस विजयसिंह परबत व कुर्डूवाडी शहराध्यक्ष संजय टोणपे यांनी निवेदन दिले.
यावेळी लोकसभा संघटक अविनाश कोळी, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, संघटन सचिव राजकुमार पाटील, प्रांतिक सदस्य गोविंदराव कुलकर्णी, अमोल कुलकर्णी, अगरचंद धोका, उमेश पाटील, सागर कोले, भरत शर्मा, क्षितिज टोणपे, रेल्वे एस.सी.एस.टी. संघटनेचे महेंद्र जगताप, ए. जी. भडकवाड, अभियंता उमेश कुंभार, रेल कामगार सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष वाहेद शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.