सहकारमंत्र्यांनी केला सोलापूर-पुणे पर्यंत रेल्वेने प्रवास, प्रवाशांच्या जाणून घेतल्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:53 AM2018-09-14T10:53:06+5:302018-09-14T14:59:10+5:30

नोव्हेंबर महिन्यात सोलापूर सोशल फाउंडेशनच्यावतीने पुण्यात सोलापूर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे़.

Cooperation Minister did the journey by rail to Solapur-Pune, and the difficulties of knowing the passengers | सहकारमंत्र्यांनी केला सोलापूर-पुणे पर्यंत रेल्वेने प्रवास, प्रवाशांच्या जाणून घेतल्या अडचणी

सहकारमंत्र्यांनी केला सोलापूर-पुणे पर्यंत रेल्वेने प्रवास, प्रवाशांच्या जाणून घेतल्या अडचणी

Next
ठळक मुद्दे पुणेरी सोलापूरकरांशी सोलापूरच्या विकासाबाबत चर्चा पुण्यात सोलापूर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणारप्रवाशांच्या जवळ मोकळया जागेत बसून त्यांच्याशी चर्चा केली

सोलापूर : राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरूवारी सकाळी सोलापूर - पुणे असा इंटरसिटी रेल्वेने प्रवास केला.

 यावेळी सहकारमंत्र्यांनी प्रवाशांची मुक्त संवाद साधला़ स्वत: एसीमधून प्रवास करणारे सहकारमंत्र्यांनी नॉन एसी डब्यात जाऊन तेथील प्रवाशांच्या जवळ मोकळया जागेत बसून त्यांच्याशी चर्चा केली़ वेगवेगळ्या घटकातील प्रवाशांना वेगवेगळ्या डब्यात शेजारी बसून त्यांनी संवाद साधला़ गणेशोत्सवासाठी आलेले पुणेरी सोलापूरकर सोलापूरच्या विकासाबाबत चर्चा केली़ त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुचना व अपेक्षा जाणून घेतल्या.

नोव्हेंबर महिन्यात सोलापूर सोशल फाउंडेशनच्यावतीने पुण्यात सोलापूर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे़ या महोत्सवाची माहिती त्यांना देत महोत्सवाचे निमंत्रणही दिले़ पुण्यातील सोलापूरकरांना विविध उपक्रम आणि सोलापूरच्या विकासाच्या संकल्पना सांगितल्या़ 

Web Title: Cooperation Minister did the journey by rail to Solapur-Pune, and the difficulties of knowing the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.