शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वाळू अन् पाण्याअभावी सोलापूर जिल्ह्यातील बांधकामे रखडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 14:03 IST

माळशिरस : वीट, वाळू, पाणी , सिमेंट याबरोबरच ठेकेदार, गवंडी, बिगारी, पेंटर, आर्किटेक्चर अशा अनेकांच्या साखळी कामामुळे इमारत उभारते. ...

ठळक मुद्देबांधकाम साहित्याचे दर वाढले : मजुरांना संसाराचा गाडा हाकणेसुद्धा झाले कठीणदुष्काळात तेरावा म्हणून की काय बांधकाम साहित्याचे दरही वाढलेले

माळशिरस : वीट, वाळू, पाणी, सिमेंट याबरोबरच ठेकेदार, गवंडी, बिगारी, पेंटर, आर्किटेक्चर अशा अनेकांच्या साखळी कामामुळे इमारत उभारते. या व्यवसायात मोठी उलाढाल होत असते़ हजारो मजुरांची रोजीरोटी यावर अवलंबून आहे, मात्र सध्या वाळू आणि पाण्याअभावी बांधकामे रखडल्याचे दिसून येतात़ इतकेच नाही तर दुष्काळात तेरावा म्हणून की काय बांधकाम साहित्याचे दरही वाढलेले आहेत़ त्यामुळे मजुरांना संसाराचा गाडा हाकणेसुद्धा कठीण झाल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास, रमाई आवास, इंदिरा आवास घरकूल योजनांमधील बांधकामे वेळेत पूर्ण करून घेणे अधिकाºयांना बंधनकारक असते़ प्रत्येक वर्षाचे ठराविक उद्दिष्ट असते़ परंतु यंदा या सर्व योजनांमधील बांधकामे रखडल्याचे दिसून येतात़ त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाळूची टंचाई आणि दुष्काळामुळे पाण्याचा अभाव होय़ तसेच सिमेंट व स्टीलचे दर वाढलेले दिसून येत आहेत़ त्यामुळे या सर्व गोष्टींचा व्यवसायावर ही परिणाम झाल्याचे दिसून येते़ अनेक बांधकामे अर्धवट स्थितीत आहेत तर अनेक कामांना मुहूर्त रखडलेला आहे. वाळूऐवजी (क्रश सॅन्ड) लहान खडी वापरली जात असली तरी हा व्यवसाय मंदीच्या सावटाखाली आहे.या सर्व गोष्टीमुळे या बांधकामावर काम करणाºया मजुरांचे हाल होताना दिसतात़ कारण त्यांचा संसाराचा गाडा हाकणे कठीण होऊ लागले आहे.

बांधकामाचा वेग मंदावला- तालुक्यात प्रतिवर्षी ५०० ते ५५० बांधकामे पक्की आरसीसी होतात तर साध्या पद्धतीची १५०० ते १६०० घरे तयार होतात़ पक्क्या बांधकामाला प्रती घराला ३ ते ४ लाख तर लहान घरांना ४० ते ५० हजार रुपये मजुरी खर्च येतो़ सध्या वाळू उपलब्ध नसल्याने क्रश कडी, वाळू ४ ते ५ हजार रुपये ब्रासप्रमाणे खरेदी करावी लागते़ सिमेंट व स्टीलमध्ये १५ टक्के वाढ झालेली आहे़ मजुरी व वीट यांचे दर मात्र स्थिर आहेत़ याशिवाय उन्हाची तीव्रता वाढल्याने बांधकामासाठी लागणारे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही़ अशा वेगवेगळ्या कारणाने सध्या बांधकाम व्यवसायाचा वेग मंदावल्याचे दिसून येते, असे काही ठेकेदार व मजुरांनी सांगितले़

उसाची बिले मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील काही बांधकामांना सुरुवात झाली होती, मात्र वाळूचा तुटवडा व इतर साहित्यांचे वाढलेले दर आणि मुख्यत्वे उपलब्ध नसलेले पाणी यामुळे अनेक कामे अर्धवट स्थितीत रखडलेली आहेत़ त्यामुळे या व्यवसायाशी निगडित असणाºया अनेक घटकांवर परिणाम होत आहे़- रमेश तरंगे,आर्किटेक्चर, तरंगफळ

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळWaterपाणी