Consolation; 66 Kovid Care Centers closed in Solapur district; Consequences of patient reduction | दिलासा; सोलापूर जिल्ह्यातील ६६ कोविड केअर सेंटर बंद; रुग्ण कमी झाल्याचा परिणाम

दिलासा; सोलापूर जिल्ह्यातील ६६ कोविड केअर सेंटर बंद; रुग्ण कमी झाल्याचा परिणाम

सोलापूर : जिल्ह्यात कोरोना पॉझीटीव्ह येणाºया रुग्णांची संख्या कमी झाल्याने ६६ केअर सेंटर बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.

डिसेंबरअखेर जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या घटत गेली आहे. कोरोना साथीच्या काळात रुग्ण वाढल्याने तालुका व गावस्तरावर ७७ केअर सेंटर उघडण्यात आले होते. पण आता रुग्ण कमी झाल्याने फक्त तालुकास्तरावर एकच केअर सेंटर सुरू ठेवले आहे. त्यामुळे  ११ केअर सेंटर वगळता इतर ६६ केंद्र बंद करण्यात आली आहेत. यातील कंत्राटी कर्मचाºयांना ब्रेक देण्यात आला आहे तर आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांच्या मूळ ठिकाणी सेवेत आले आहेत. त्यामुळे आता आरोग्य केंद्रातील दैनंदिन कामकाज सुरू करण्यात आले आहे.

अतिदक्षता केंद्र जिल्हा स्तरावर सिव्हिल हॉस्पीटल, तालुकास्तरावर पंढरपूर, माळशिरस, बार्शी येथे आणि शहरस्तरावर महापालिकेचे एक बॉईस हॉस्पीटल सुरू ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील काही खाजगी रुग्णालयातील सेवा सुरूच आहे. आता लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाºयांचा वापर करण्यात येत आहे.

चाचणी केंद्राची पाहणी
जिल्हा आरोग्य विभागातर्फे होटगी आरोग्य केंद्रावर शुक्रवारी लसीकरणाची रंगीत तालीम घेतली जाणार आहे. या ठिकाणी करण्यात येणाºया तयारीची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जाधव यांनी पाहणी केली व व्यवस्थेबाबत सूचना केल्या.

चाचण्याची प्रतिक्षा वाढली
आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार प्रयोगशाळेच्या चाचण्यावर भर देण्यात आला आहे. पण सिव्हिल हॉस्पीटल प्रयोगशाळेची क्षमता ५00 पर्यंत असल्याने प्रतिक्षा यादी वाढत चालली आहे. गुरूवारी ९३५ अहवाल प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Consolation; 66 Kovid Care Centers closed in Solapur district; Consequences of patient reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.