Congress losers against Solapur fuel price hike | इंधन दरवाढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसचे धरणे
इंधन दरवाढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसचे धरणे

ठळक मुद्दे- काँग्रेसच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर- सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला- राज्य सरकारची उदासीनतेबाबत काँग्रेसची फलकबाजी

सोलापूर : मोदी सरकारने अन्यायकारक इंधन दरवाढ केल्याच्या निषेधार्थ तसेच मालाड भिंत व तिवरे धरण फुटीतील दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, नगरसेविका परविन इनामदार, माजी महापौर संजय हेमगड्डी, अलका राठोड, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, अंबादास करगुळे, तिरुपती परकीपंडला,  हारून शेख, मनीष गडदे, अप्पाशा म्हेत्रे, सुमन जाधव, संध्या काळे, मैनोद्दीन शेख, जेम्स जंगम, अशोक कलशेट्टी, भीमाशंकर टेकाळे, युवराज जाधव आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध केला. मंत्री तानाजी सावंत यांनी खेकड्यामुळे तिवरे धरण फुटल्याचे हास्यास्पद कारण सांगितले आहे. पीककर्ज वाटपात शेतकºयांची होत असलेली अडवणूक, वाढती महागाई, केंद्र व राज्य सरकारची उदासीनता अशा घोषणा असलेले फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. आंदोलनात बसवराज म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, कोमोरो सय्यद, राजन कामत, आप्पासाहेब बगले, प्रमोद नंदूरकर, चांदप्पा क्षेत्री, अरुणा वर्मा, किरण नंदूरकर, प्रमिला तुपलवंडे, श्रीधर काटकर, शकील मौलवी, चक्रपाणी गज्जम, योगेश मार्गम, चैनसिंग गोयल आदी सहभागी झाले होते. 


Web Title: Congress losers against Solapur fuel price hike
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.