शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील काॅंग्रेस नेत्यांची उद्या मुंबईत तातडीची बैठक; जिल्हाध्यक्ष बदलाची चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 12:57 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

साेलापूर -  शहर आणि जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या कामांचा आढावा आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटाेळे यांनी बुधवारी मुंबईत बैठक बाेलावली आहे. या बैठकीत काॅंग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलाचा मुद्दा उपस्थित हाेईल, अशी चर्चा काॅंग्रेस भवनात आहे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्याकडे आल्यानंतर काॅंग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कार्यक्रम ठरवून देण्यात आले आहेत. संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी बुधवारी बैठक हाेणार आहे. जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अशपाक बळाेरगी, शहराध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुणकुमार शर्मा यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश आहेत.

काॅंग्रेसचे शहरातील पदाधिकारी केंद्र सरकारच्या विराेधात नेहमीच आक्रमक करतात. युवक काॅंग्रेस, महिला काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक कार्यक्रम राबविले जातात. आंदाेलने केली जातात. या तुलनेत जिल्हा काॅंग्रेसमध्ये फारसे काही हाेत नसल्याचा सूर पदाधिकाऱ्यांकडून काढला जाताे. जिल्हा काॅंग्रेसलाही आक्रमक चेहरा मिळावा अशी मागणाी अनेक तालुका पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली हाेती. प्रदेशाध्यक्ष नाना पटाेळे यांच्याकडे दक्षिण साेलापूर आणि अक्कलकाेट तालुक्यातील एक शिष्टमंडळही जाउन आले हाेते. बुधवारच्या बैठकीत यावर चर्चा हाेण्याची शक्यता आहे.

 पाटलांना मुदतवाढ पण सुरेश हसापुरे यांचीही चर्चा 

काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी प्रकाश पाटील यांना मुदतवाढ मिळेल अशी चर्चा आहे. शिवाय जिल्हा बॅंकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्याकडेही जिल्हाध्यक्षपद येईल, असेही काॅंग्रेस भवनातील लाेक सांगतात. जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, जिल्हा दूध संघासह इतर संस्थांमधील उलथापालथीमध्ये हसापुरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्नही  सुरेश हसापुरे यांनी केला हाेता. त्यातूनच हसापुरे यांचे नाव चर्चेत आल्याचे दक्षिण साेलापूर तालुक्यातील काॅंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारण