शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सोलापूर मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखली, तौफिक हत्तुरे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 12:43 IST

विरोधकांनी ही जागा खेचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण जागा कायम राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. 

ठळक मुद्देतौफिक हत्तुरे यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केलामतमोजणीअगोदर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी तयारीची पाहणी केली

 एमआयएमच्या उमेदवार शेख यांचा पराभवसोलापूर: प्रभाग १४ क च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तौफिक हत्तुरे १६0४ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती, विरोधकांनी ही जागा खेचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण जागा कायम राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. पोटनिवडणुकीत उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. तौफिक हत्तुरे (काँग्रेस): ४९४४, रणजित दवेवाले (भाजप): १९२१, सद्दाम शाब्दी (राष्ट्रवादी काँग्रेस): ९00, बापू ढगे (शिवसेना): ८५३, नलिनी कलबुर्गी (माकप): ११६९, पीरअहमद शेख (एमआयएम): ३३४0, वसीम सालार (अपक्ष): ४९९, कैय्युम सिद्धकी (मनसे)१५, म. गौस कुरेशी (हिंदुस्तान जनता पार्टी): ३0. नोटा: ५१. शनिवारी सकाळी १0 वा. कोटणीस हॉलमध्ये मतमोजणी सुरू झाली. टपाली एकही मतदान नव्हते. पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे उमेदवार हत्तुरे यांनी १८0 मते मिळवत १0६ मतांची आघाडी घेतली. भाजपचे दववाले यांना केवळ ९ तर सेनेचे ढगे यांना २५, एमआयएमचे शेख यांना ७४, माकपच्या कलबुर्गी यांना १९ तर राष्ट्रवादीचे शाब्दी यांना केवळ ८ मते मिळाली. पाच फेºयात मतमोजणी झाली. प्रत्येक फेरीनिहाय ८ बुथ मोजणीसाठी घेण्यात आले. दुसºया फेरीत काँग्रेसच्या उमेदवाराने १११७ तर तिसºया फेरीत १४0४ मतांनी आघाडी घेतली. पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखण्यात यश मिळविले. रफिक हत्तुरे यांचे निधन झाल्यावर काँग्रेसने त्यांचे बंधू तौफिक हत्तुरे यांना उमेदवारी दिली.  मनपाच्या सार्वत्रिक निवडणकुीत प्रभाग १४ मधील तीन जागांवर एमआयएमच्या उमेदवार विजयी झाले तर फक्त १४ क ही जागा काँग्रेसने जिंकली होती. त्यामुळे एमआयएमने ही जागा खेचण्यासाठी शक्ती पणाला लावली होती. तर या चुरशीचा फायदा उचलण्यासाठी भाजप व सेनेनेही चांगली तयारी केली होती. खरी लढत काँग्रेस व एमआयएमच्या उमेदवारात झाल्याचे मतदानावरून दिसून आले. भाजपवगळता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपच्या उमेदवारांना डिपॉझीट वाचवता आले नाही. 

काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोषतौफिक हत्तुरे यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मतमोजणी शांततेत व वेळेवर पार पडली. मतमोजणीअगोदर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी तयारीची पाहणी केली. सहायक निवडणुक अधिकारी अरुणा गायकवाड यांनी फेरीनिहाय निकाल घोषीत केले. मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाElectionनिवडणूक