शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

coronavirus; घरातल्या मंडळींनी मोबाईल बाजूला ठेवून कॅरमवरची धूळ झटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 10:37 AM

‘ते’ सध्या काय करताहेत ?; ‘लोकमत’ आजपासून रोज एका फॅमिलीसोबत...

ठळक मुद्देसध्या अनेकांच्या घरात ना उत्सव, ना कोणता घरगुती कार्यक्रम, पण तरीही घरोघरी उत्साहाला उधाणकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आई-वडिलांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश निघाला तर दुसरीकडे मुलांच्या शाळांना सुटी मिळालीसध्या प्रत्येकाच्या घराचं गोकुळ झालं असून, घर आनंदानं न्हाल्याचं चित्र आहे

प्रभू पुजारी सोलापूर : सध्या अनेकांच्या घरात ना उत्सव, ना कोणता घरगुती कार्यक्रम, पण तरीही घरोघरी उत्साहाला उधाण आल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आई-वडिलांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश निघाला तर दुसरीकडे मुलांच्या शाळांना सुटी मिळाली़ त्यामुळे सध्या प्रत्येकाच्या घराचं गोकुळ झालं असून, घर आनंदानं न्हाल्याचं चित्र आहे.

सध्या अनेकांच्या घरातील एक किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य नोकरीला किंवा उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने सकाळी-सकाळीच बाहेर पडतात़ मुलांची शाळा, क्लासेस व अन्य कलाप्रकार शिकण्यासाठी सतत बाहेरच असतात़ परिणामी प्रत्येकाच्या घरातील संवाद हरवत चाललेला आहे़ थोडक्यात काय तर कामाच्या व्यापामुळे जीवनशैली बदलली आहे़ त्यामुळे प्रत्येकाला जगण्याचा अर्थ कळूनही वेळेअभावी घरात संवाद नावाचा बोलका चेहरा गळून पडताना दिसतो. कुणी-कुणाला वेळ द्यायला तयार नाही. अगदी तोलूनमापून बोलणे़ काही काही घरात संचारबंदी असल्यासारखी माणसं वावरताना दिसतात.

ज्येष्ठांना त्यांचे अनुभव शेअर करायचे असतात, नातवंडांना त्यांच्या आई-वडिलांच्या बालपणीच्या आठवणी, खोड्या आणि दंगामस्तीचे काही क्षण जिवंत करून सांगायचे असतात, पण मुलांवर शाळेच्या अभ्यासाचे ओझे, खासगी शिकवणीची प्रतिष्ठा लादलेली असते. त्यामुळे तेसुद्धा आजी-आजोबांना टाळतात. कामाचा व्याप, मानसिक ताणतणाव, व्यवसायातील चढ-उतार किंवा जगासोबत धावण्याची लावून घेतलेली स्पर्धा अशा अनेक कारणांनी घरातला संवाद थांबल्याने भिंतीही अबोल झाल्यासारखे चित्र आहे.

सध्या कोरोना व्हायरसच्या भीतीने शासनाने शाळांना सुट्या जाहीर केल्या आहेत़ बच्चे कंपनींच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत़ नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश दिला आहे़ त्यामुळे बच्चेकंपनी, रोज कामाला जाणारे आई-बाबा व इतर मंडळी घरातच आहेत़ त्यामुळे बच्चे कंपनीला आईबाबांचा निरंतर सहवास लाभत आहे़ आपलाही वेळ आनंदात जावा म्हणून घरातील मोठी मंडळी लहान मुलांसोबत कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, पत्ते, सापसिडी आदीप्रकारच्या बैठे खेळात रममाण होत आहेत़ परिणामी अनेकांनी  काही काळ का होईना मोबाईलला अलिप्त ठेवल्याचे चित्र घराघरांतून पाहायला मिळत आहे.

मी शिक्षक आहे़ सकाळची शाळा असल्याने लवकरच जावे लागते़ परत घरी जेव्हा येतो, तेव्हा मुले शाळेला गेलेली असतात़ त्यामुळे आमच्यात फारसा संवाद होत नाही़ सध्या मुलांसोबत वेळ घालवत असल्यामुळे आनंद वाटत आहे़                           - नागेश होसुरे, शिक्षक 

कित्येक दिवसांनी इतका वेळ आई-बाबांसोबत संपूर्ण दिवस घालवत आहे़ दिवसभर विविध खेळ खेळण्यात व्यस्त असून, गाण्यांच्या भेंड्याही खेळत आहे़ एकूण घरात खूप आनंदी वातावरण आहे़- शशांक कणमुसे, विद्यार्थी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य