नांदेड येथील हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षेची प्रक्रिया पूर्ण करा!
By संताजी शिंदे | Updated: June 6, 2023 12:10 IST2023-06-06T12:10:28+5:302023-06-06T12:10:45+5:30
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेड येथील हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षेची प्रक्रिया पूर्ण करा!
सोलापूर : नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावातील अक्षय भालेराव याचा निघृण खून केल्याप्रकरणी, संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशी मागणी, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून गावगुंडांनी अक्षय भालेराव या तरूणाचा निघृण खून केला. हत्या केल्यानंतर आरोपी साेशल मीडियावर हत्या केल्याचे निर्भीडपणे जाहीर कबुली देत आहेत. आरोपींवर तातडीने कारवाई करावी. स्वतंत्र जलद न्यायालयात प्रकरण घेऊन न्यायालयीन प्रक्रीया पूर्ण करून सक्षम सरकारी वकील द्यावा. आरोपींचे चार्जशीट भक्कम पद्धतीने तयार करून आरोपी सुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. आरोपीं विरूद्ध ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत सर्व कलमे लावण्यात यावीत. सर्व आरोपींना शिक्षा लावण्यात यावी. कोणतेही सक्षीदार फुटता कामा नये. अक्षय भालेराव यांच्या कुटूंबाचे संपूर्ण पुर्नवसन करावे, नातेवाईकांना ५० लाखाची शासकीय मदत जाहीर करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, जिल्हा महासचिव अनिरूद्ध वाघमारे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, जिल्हाउपाध्यक्ष रवी थोरात, जिल्हा संघटक जालिंदर चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष भाईराजा सोनकांबळे, महिला शहर अध्यक्षा पल्लवी सुरवसे, विजय गायकवाड, गौतम थापटे, श्रीनिवास संगेपांग आदी कार्यकर्ते उपस्थित होते.