शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"तू एवढे पैसे कसे कमावले"; मॅनेजरच्या घरात घुसून वाल्मीक कराडच्या मुलाने दाखवली बंदूक, कोर्टात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 09:14 IST

सुशील कराडने घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत लूट केल्याची कोर्टाकडे तक्रार

Beed Sarpanch Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून अटक असलेल्या वाल्मीक कराडच्या मुलाचा प्रताप समोर आला आहे. वाल्मीक कराड याच्यानंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड हा देखील अडचणीत आला आहे. वाल्मीक कराडच्या मुलाच्या विरोधात सोलापूर न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना सुशील कराड विरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना न्यायालयाने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सुशील कराड याने एका मॅनेजरच्या घरात घुसून लूट केल्याची तक्रार असल्याचे अर्जात म्हटलं आहे. दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोनं लुटल्याची तक्रार सुशील विरोधात आहे. त्यामुळे आता मुलगा सुशील कराडवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. सुशील कुमारकडे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची लूट केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. मूळचे सोलापूरचे असलेली ही व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करत असताना सुशील कराडने त्यांची संपती लुटली. तुम्ही आमची संपत्ती लुटली असा आरोप करत सुशील कराडने मारहाण करत आणि रिव्हॉलवरचा धाक दाखवत आपली संप ताब्यात घेतली, असा आरोप मॅनेजरने केला. बीड आणि सोलापूर पोलिसांवरही या मॅनेजरने आरोप केले आहेत. पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने आम्ही सोलापूर न्यायालयात अर्ज दाखल करत असल्याची माहिती तक्रारीद्वारे दिली आहे.

२०२५ च्या ऑगस्ट महिन्यात हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या प्रकरणी सोलापूर न्यायालयात सुनावणी सुरु होती. अद्याप न्यायालयाने यासंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही. याप्रकरणी सुशील कराड आणि अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार विरोधात गुन्ह्याची नोंद करुन चौकशी करण्याची मागणी मॅनेजरने सोलापूर न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे. 

वकिलांनी काय सांगितले?

"पीडित महिलेचा पती सुशील कराड याच्याकडे कामाला होता. त्यावेळी सुशील कराड त्याला वारंवार तू एवढे पैसे कसे कमावले, दोन ट्रक, दोन गाड्या कशा आल्या हे विचारायचा. असं म्हणत सुशील कराड त्या व्यक्तीला कायम मारहाण करत होता. सोलापूरमधील पोलिसांनी त्यांच्या तक्रार अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही. शेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला," अशी माहिती पीडितेचे वकील विनोद सूर्यवंशी यांनी दिली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडSolapurसोलापूर