जवळगावात शिविगाळ करून गोळीबार केल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:15 IST2021-06-30T04:15:21+5:302021-06-30T04:15:21+5:30

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार प्रमोद ढेंगळे हे बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान बसस्थानकावरून घरी जात होते. इतक्यात डिसले यांनी डोक्याला ...

Complaint of abusive firing in nearby village | जवळगावात शिविगाळ करून गोळीबार केल्याची तक्रार

जवळगावात शिविगाळ करून गोळीबार केल्याची तक्रार

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार प्रमोद ढेंगळे हे बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान बसस्थानकावरून घरी जात होते. इतक्यात डिसले यांनी डोक्याला बंदूक लावून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा पळून जाताना त्यांनी पाठीमागून गोळी झाडल्याचा आवाज ऐकला. मात्र, फिर्यादीला ती लागली नाही. ते घरात जाऊन बसले असता घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप ढेंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे.

या घटनेनंतर मंगळवारी व्यंकटेश ढेंगळे व सुरेश कापसे यांच्यापासून धोका असल्याचे पत्र कोल्हापूर महपरीनिरीक्षक व पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

-----

माझ्याकडून असा कोणताही प्रकार घडलेला नाही. संबंधितांनी राजकीय द्वेषातून माझ्याविरूद्ध खोटी तक्रार केली आहे. रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचे लगेच लक्षात येते. तपासात खरे काय ते निष्पन्न होईलच.

त्यामुळे मी संबंधितांविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

- अनिल डिसले, सभापती पंचायत समिती, बार्शी

Web Title: Complaint of abusive firing in nearby village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.