सोलापूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीसाठी समिती गठित

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: June 12, 2023 17:48 IST2023-06-12T17:47:35+5:302023-06-12T17:48:05+5:30

५ मे रोजी कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस यांची पाच वर्षांची कारकीर्द संपली. त्यांच्या ठिकाणी डॉ. राजनीश कामत यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला.

Committee constituted for selection of new Vice-Chancellor of Solapur University | सोलापूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीसाठी समिती गठित

सोलापूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीसाठी समिती गठित

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूसाठी चार सदस्यीय समिती गठीत झाली असून आठ दिवसात अर्ज मागविण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध करू, अशी माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी सोमवारी लोकमतला दिली.

५ मे रोजी कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस यांची पाच वर्षांची कारकीर्द संपली. त्यांच्या ठिकाणी डॉ. राजनीश कामत यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. महिनाभरानंतर आता नवीन कुलगुरू निवडीसाठी प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे. सोलापूर विद्यापीठाने नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांची सदस्य म्हणून शिफारस केली आहे.
त्यांच्यासोबत उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, युजीसीकडून एक सदस्य तसेच राज्यपाल भवनकडून एक सदस्य अशा चार सदस्यांची नियुक्ती झाली आहे.

Web Title: Committee constituted for selection of new Vice-Chancellor of Solapur University