दिलासादायक बातमी; माळशिरस तालुक्यात शुक्रवारी पहाटे मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 10:34 AM2020-06-26T10:34:28+5:302020-06-26T11:35:48+5:30

एकाच रात्रीत नातेपुतेत 105 तर माळशिरसमध्ये 103 मिमी पाऊस

Comforting news; Heavy rain in Malshiras taluka on Friday morning | दिलासादायक बातमी; माळशिरस तालुक्यात शुक्रवारी पहाटे मुसळधार पाऊस

दिलासादायक बातमी; माळशिरस तालुक्यात शुक्रवारी पहाटे मुसळधार पाऊस

Next

माळशिरस : माळशिरस तालुक्यास शुक्रवारी पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. नातेपुते मंडळात 105 मिमी तर माळशिरस मंडलात 103 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.


माळशिरस तालुक्यात यंदा मोसमी पावसाचे आगमन वेळेवर झाले आहे. मात्र शुक्रवारी ( दि. 26 रोजी ) पहाटे 3 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. तालुक्यातील सर्वच मंडलात कमी – जास्त पाऊस झाला असला तरी नातेपुते, धर्मपुरी, माळशिरस, अकलूज, वेळापूर या मंडळात सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे. माळशिरस तालुक्यास लगत असलेल्या भाळवणी ( ता पंढरपूर ) 78 मिमी. आणि म्हसवड ( ता. माण, जि सातारा ) 96 मिमी या मंडलातही मुसळधार पाऊस झाला आहे.


माळशिरस तालुक्यात मंडलनिहाय

झालेला पाऊस खालील प्रमाणे आहे.

  • धर्मपुरी = 82 मिमी
  • नातेपुते = 105 मिमी
  • माळशिरस = 103 मिमी
  • वेळापूर = 44 मिमी
  • अकलूज = 92 मिमी
  • भाळवणी = 78 मिमी
  • म्हसवड = 96 मिमी

पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यातील मंडलनिहाय पाऊस खालील प्रमाणे

  • पिंपरा. 33 मिमी
  • वडगाव. 64 मिमी
  • मा.वस्ती. 106 मिमी
  • पणदरे.बं 90 मिमी
  • माळेगाव कॉ. 65 मिमी
  • बारामती. 55 मिमी
  • सनसर. 36 मिमी
  • अंथुर्णे. 38 मिमी
  • निमगाव. 38 मिमी
  • बावडा. 42 मिमी

Web Title: Comforting news; Heavy rain in Malshiras taluka on Friday morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.