महिलांच्या तणावमुक्तीसाठी हास्यविनोद कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:12 IST2021-01-08T05:12:14+5:302021-01-08T05:12:14+5:30

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटना व सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटना यांच्या संयुक्तपणे हा विनोदी कार्यक्रम घेण्यात आला. कवी ...

Comedy programs for women's stress relief | महिलांच्या तणावमुक्तीसाठी हास्यविनोद कार्यक्रम

महिलांच्या तणावमुक्तीसाठी हास्यविनोद कार्यक्रम

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटना व सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटना यांच्या संयुक्तपणे हा विनोदी कार्यक्रम घेण्यात आला. कवी सुनील नावंदर यांनी आपल्या खास शैलीने विनोदी किस्से सांगून उपस्थितांना खळखळून हसविले.

सध्याच्या ताण तणावाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाची सुरुवात हास्याने व तणावरहित होण्यासाठी, महिलांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संयोजकांनी सांगितले. संघटनेच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा लता लाहोटी यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष बसंती भराडीया यांनी स्वागत केले. यावेळी माहेश्वरी महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष अनुसूया मालू, सचिव पल्लोड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजकमल हेड्डा, शीतल तापडीया, कोषाध्यक्ष निर्मला बलदवा, मीना काबरा, सपना लाहोटी उपस्थित होत्या. डॉ. श्वेतल सोमाणी यांनी सूत्रसंचालन केले, तर सरोज गट्टाणी व पद्मा भुतडा यांनी आभार मानले.

Web Title: Comedy programs for women's stress relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.