आ. बच्चू कडूंच्या हस्ते 'शासन दिव्यांगांच्या दारी' उपक्रमाचे उद्घाटन

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: September 20, 2023 16:26 IST2023-09-20T16:24:06+5:302023-09-20T16:26:22+5:30

उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

come Inauguration of 'Shasan Divyangane Dari' initiative by Bachchu Kadu | आ. बच्चू कडूंच्या हस्ते 'शासन दिव्यांगांच्या दारी' उपक्रमाचे उद्घाटन

आ. बच्चू कडूंच्या हस्ते 'शासन दिव्यांगांच्या दारी' उपक्रमाचे उद्घाटन

सोलापूर : शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळवून देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात 'शासन दिव्यांगांच्या दारी' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी दुपारी आमदार कडू यांच्या हस्ते झाले. उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

होटगी रस्त्यावरील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या सभागृहात हा उपक्रम सुरू आहे. सायंकाळी सहा पर्यंत उपक्रम सुरू राहणार असून आमदार कडू हे दिव्यांग बांधवांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या अडचणी ऐकून घेत आहेत. कागदपत्रांची तपासणी करून सभागृहातच लाभार्थींना योजनांचा लाभ दिला जाणार आहे. उपक्रमाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी असून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली आहेत. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे सीईओ मनीषा आव्हाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: come Inauguration of 'Shasan Divyangane Dari' initiative by Bachchu Kadu