शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दोन हजार छायाचित्रांच्या संग्रहातून जपलेत महामानवाच्या जीवनातील क्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 9:55 AM

शांतीकुमार नागटिळकांचा ध्यास : आंदोलने, दीक्षाभूमी सोहळा अन् बºयाच फोटोंचा खजिना; राज्यातील विविध शहरांत भरविले प्रदर्शन

ठळक मुद्देअकरा वर्षांपासून भारतरत्न डॉ़ बाबासाहेबांच्या जीवनावरील दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन या माध्यमातून त्यांच्या कार्यास उजाळा देत समाजप्रबोधन करणे हा हेतू बाबासाहेबांचे सहकारी भालेराव यांच्याकडून सोलापूर भेटीची दुर्मिळ चित्रे मिळाली

यशवंत सादूल 

सोलापूर : भारतीय समाजातील शोषित, पीडित, निराश्रित माणसांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी हक्क मिळवून देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजीवन संघर्ष केला. मूलभूत अधिकारांपासून वंचित असलेल्या सर्वांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अधिकार मिळवून देण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून लढा देणाºया बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून संचित झालेले आहेत़ या चित्रांचा शोध घेऊन सरकारी दस्तऐवज, आॅटोबायोग्राफी, अनुयायांकडून गोळा करून जवळपास दोन हजार चित्रांचा संग्रह करून ठेवला आहे, शांतीकुमार नागटिळक यांनी.

मागील पंधरा वर्षांपासून त्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून महामानवांच्या स्मृतींना उजाळा देत आहेत़ पेशाने छायाचित्रकार असलेल्या शांतीकुमार यांनी २००४ सालच्या आंबेडकर जयंती मिरवणुकीत बाबासाहेबांच्या जीवनातील पंचवीस छायाचित्रे प्रदर्शित केली होती़ त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंबेडकरप्रेमींनी त्या फोटोंसमोर सेल्फी काढून घेत दाद दिली़ आणखी दुर्मिळ छायाचित्रे मिळवून त्याचे प्रदर्शन भरविण्याचा निश्चय करून नागटिळक यांनी राज्यभर भ्रमंती केली.

पुणे येथील सिम्बॉयसिस कॉलेज, नागपूर येथील चिंचोळी संग्रहालय, मुंबईच्या राजगृह संग्रहालय, औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय येथून जमा केले़ बाबासाहेबांसोबत काम केलेले त्यांचे अनुयायी व त्यांच्या वारसांकडून ही छायाचित्रे जमा केली असून, त्याला जवळपास दोन ते अडीच वर्षे लागली. बाबासाहेबांच्या जीवनातील चवदार तळे आंदोलन, काळाराम मंदिर सत्याग्रह, दीक्षाभूमी बौद्ध धर्म दीक्षा सोहळा, अजंठा-वेरूळ भेट, घटना समिती बैठक, कॉलेज जीवनातील काही प्रसंगांची छायाचित्रे जमा  केली़ सोलापूरशी संबंधित महार   वतन परिषदेत सहभाग, पंचाची चावडी परिषद, बी. सी. होस्टेलला   भेट  या छायाचित्रांचाही यामध्ये समावेश आहे.

 काही फोटो हे मूळ स्वरूपात मिळाले तर काही सरकारी दस्तऐवज, त्यांच्या आॅटोबायोग्राफी पुस्तकातून  तर काही त्यांचे अनुयायी वारसदारांकडून मिळवले आहेत़ या सर्व दुर्मिळ  फोटोंचे प्रदर्शन २००७ पासून भरविण्यास सुरुवात केली  आहे़   बारा बाय अठरा इंच साईजची ही छायाचित्रे असून, सर्व कृष्ण-  धवल आहेत. सोलापूरव्यतिरिक्त औरंगाबाद, बीड, मुंबई येथेही प्रदर्शन भरविण्यात आले़

दुर्मिळ छायाचित्रे... महाडचे चवदार तळे आंदोलन, बौद्ध धर्म दीक्षा, काळाराम मंदिर सत्याग्रह यासह नेपाळ बौद्ध परिषद, डॉ़ श्यामाप्रसाद मुखर्जी, संत गाडगेबाबा, छत्रपती शाहू महाराज आदींची भेट, त्यांच्या कॉलेज जीवनातील काही दुर्मिळ फोटो, परिवारासोबतचे फोटो, कायदे मंत्री म्हणून शपथ घेताना, घटना समिती सदस्यांसोबत, घोड्यावर स्वार, कॅमेºयाने स्वत: फोटो काढताना, भीमा-कोरेगावला भेट, महार रेजिमेंटला भेट, त्यांचे अखेरचे महानिर्वाण झाल्यानंतरचे भावनाप्रधान प्रसंग या दुर्मिळ चित्रांमध्ये समावेश आहे. 

भारतरत्न डॉ़ बाबासाहेबांच्या जीवनावरील दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन अकरा वर्षांपासून भरवत आहे़ या माध्यमातून त्यांच्या कार्यास उजाळा देत समाजप्रबोधन करणे हा हेतू आहे़ यातूनच बाबासाहेबांचे सहकारी भालेराव यांच्याकडून सोलापूर भेटीची दुर्मिळ चित्रे मिळाली. वळसंगला भेट दिल्याची चित्रे मिळाली नाहीत, याची सल मनात आहे. आणखी चित्रे मिळविण्याचा प्रयत्न सतत करणार आहे़- शांतीकुमार नागटिळक, संग्राहक 

टॅग्स :SolapurसोलापूरDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरPhotography Dayफोटोग्राफी डे