बंद हॉटेलला शॉट सर्किटने आग ; गॅस सिलेंडरचाही स्फोट
By प्रताप राठोड | Updated: March 10, 2023 17:31 IST2023-03-10T17:31:15+5:302023-03-10T17:31:23+5:30
गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास हॉटेल व्यवसायिक नितीन खळदकर हे त्यांचे स्वामी समर्थ हॉटेल बंद करून घरी गेले होते. रात्री दहाच्या सुमारास बंद असलेल्या हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किट होवून आग लागली.

बंद हॉटेलला शॉट सर्किटने आग ; गॅस सिलेंडरचाही स्फोट
सोलापूर : बंद असलेल्या हॉटेलमध्ये शॉट सर्किट होवून आग लागली. यावेळी आगीच्या ठिणग्या उडून त्या आतील सिलिंडरवर पडल्या. यात सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना बार्शी - कुर्डूवाडी रोडवरील अलीपूर बायपास चौकाजवळ घडली. या घटनेते हॉटेलशेजारी असलेले एक वर्कशॉपदेखील जळाले. ही आगीची घटना गुरुवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली.
गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास हॉटेल व्यवसायिक नितीन खळदकर हे त्यांचे स्वामी समर्थ हॉटेल बंद करून घरी गेले होते. रात्री दहाच्या सुमारास बंद असलेल्या हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किट होवून आग लागली. यामध्ये आगीच्या ठिणग्या उडून गॅस सिलेंडरवर पडल्या. यावेळी दोन सिलेंडर गॅस टाक्यांचा स्फोट झाला. या आगीमध्ये दोन फ्रीज, दोन गॅस शेगड्या, कपाट, पलास्टिक टेबल, खूर्ची, फर्निचर, किराणा साहित्य तसेच शेजारी असलेले साई इंजिनियर वर्कशॉप मधील साहित्य जळाले. आग लागलेल्या हॉटेल शेजारीच पेट्रोल पंप आहे. सुदैवाने स्फोटाच्या ठिणग्या पेट्रोल पंपाकडे गेल्या नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बार्शी नगपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने दोन फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.