Good News; महावितरणमधील उपकेंद्र व विद्युत सहाय्यकांच्या ७ हजार जागांची होणार भरती
By Appasaheb.patil | Updated: August 5, 2020 16:02 IST2020-08-05T15:59:41+5:302020-08-05T16:02:20+5:30
दोन टप्प्यात राबविण्यात येणार भरती; कोरोनाच्या उपाययोजनांचे होणार पालन

Good News; महावितरणमधील उपकेंद्र व विद्युत सहाय्यकांच्या ७ हजार जागांची होणार भरती
सोलापूर : महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक (२००० जागा) आणि विद्युत सहाय्यकाच्या(५००० जागा) भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे ऊजामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी ४ आॅगस्ट रोजी आयोजित बैठकीत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांना आदेश दिले. यापूर्वी, २३ जूनला ऊर्जामंत्री यांनी या संदर्भात भरती करण्याचे आदेश दिले होते मात्र कोविड आणि लॉकडाऊनमुळे त्यास विलंब झाला.
आता ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात उप केंद्र सहाय्यकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर विद्युत सहाय्यक निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ७००० जागांची भरती असल्याने सोशल डीस्टंसिंग आणि कोविड नियमांच्या अधीन राहून ही पदभरती करण्यात यावी असे निर्देश ऊजामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.