सात नळविहिरीची नगरपरिषदेकडून स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:02+5:302021-01-04T04:20:02+5:30
करमाळा : ‘ माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत वसुंधरेच्या पंचतत्त्वाचे संवर्धन व त्यातील पर्यावरणातील जल अर्थात पाणी या घटकाचे संवर्धन, ...

सात नळविहिरीची नगरपरिषदेकडून स्वच्छता
करमाळा : ‘ माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत वसुंधरेच्या पंचतत्त्वाचे संवर्धन व त्यातील पर्यावरणातील जल अर्थात पाणी या घटकाचे संवर्धन, प्रदूषणमुक्त व पाणी बचत या अनुषंगाने करमाळा नगर परिषदेच्या वतीने शहरातील ऐतिहासिक सात नळविहिरीची स्वच्छता करण्यात आली.
ऐतिहासिक सातविहीर ही करमाळा शहराची शान आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सर्व जलाशय प्रदूषण मुक्त ठेवायला करमाळा नगरपालिकेने कसोशीने प्रयत्न केले आहेत. जलाशयात निर्माल्य टाकण्यास व मूर्ती विसर्जनास मनाई आहे. आज ऐतिहासिक सात विहिरीची व परिसराची सर्व झाडेझुडपे, काटेरी वनस्पती काढण्यात आली. मुख्याधिकारी वीणा पवार, स्वच्छता निरीक्षक जब्बार खान, सफाई कर्मचारी, विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
----
फोटो : ०३ सातनाळ विहिरी
करमाळा शहरातील ऐतिहासिक सातनळाची विहीर.