नववीतील मुलाने उचललं संपवलं स्वत:चं जीवन, कारण अद्याप अस्पष्ट
By रूपेश हेळवे | Updated: August 18, 2023 17:47 IST2023-08-18T17:47:14+5:302023-08-18T17:47:27+5:30
स्वत:च्या खोलीत साडीच्या सहाय्याने घेतला गळफास

नववीतील मुलाने उचललं संपवलं स्वत:चं जीवन, कारण अद्याप अस्पष्ट
रुपेश हेळवे, सोलापूर: नववीमध्ये शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. निशांत व्हनप्पा हुल्ले (वय १४, रा. भारत नगर कुमठा नाका) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी रात्री घडली.
निशांत हा नववीचे शिक्षण घेत होता. गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निशांत याने आपल्या खोलीतील अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. खूप वेळ होऊनही निशांत हा खाली न आल्याने आई त्याला पाहण्यासाठी त्याच्या खोलीत गेली. तेव्हा निशांत हा लटकलेला दिसला.
दरम्यान, तेथे आलेले निशांतचे वडील यांनी लगेच निशांतला खाली उतरवून उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण तोवर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली. निशांतच्या पश्चात आई, वडिल, दाेन भाऊ असा परिवार आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.