शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची स्ट्राँग रूम फोडून चोरले दहावीच्या भूगोलचे ५० पेपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 06:45 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीची परीक्षा सुरू असून बुधवारी, १८ मार्च रोजी भूगोल विषयाचा शेवटचा पेपर आहे. तत्पूर्वी मंगळवारी प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याने बोर्ड कस्टडीच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. 

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथील बोर्ड कस्टडी स्ट्राँगरूम फोडण्यात आली असून बुधवारी होणाऱ्या दहावीच्या भूगोल विषयाच्या सुमारे ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्या आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ८:३० च्या सुमारास उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे येथील सीसीटीव्ही बंद होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीची परीक्षा सुरू असून बुधवारी, १८ मार्च रोजी भूगोल विषयाचा शेवटचा पेपर आहे. तत्पूर्वी मंगळवारी प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याने बोर्ड कस्टडीच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. 

सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या बोर्ड कस्टडी रूममध्ये  प्रश्नपत्रिका पत्र्याच्या पेटीत ठेवून दरवाजाला बाहेरून कुलूप लावून सील केले होते. पोलिस व दोन होमगार्ड यांचा बंदोबस्त होता. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास अज्ञात इसमाने कटरच्या साह्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि पेटी क्र. ५४४९ मधील भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरल्या. तिथून जाताना दरवाज्याच्या कुलूपाला पुन्हा आहे तसा कागद गुंडाळून तेथून धूम ठोकली. 

गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक निलंबित : या प्रकरणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले व सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड या दोघांना निलंबित केल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाexamपरीक्षा