शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

साेलापुरात विमानसेवेच्या गप्पा, सिटी बस कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी ठिय्या

By राकेश कदम | Updated: June 19, 2023 18:05 IST

महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५० हून अधिक कामगार साेमवारी सायंकाळी लाल बावटा महानगरपालिका युनियनच्या नेतृत्वाखाली एकत्र आले.

सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर साेलापुरात विमानसेवेच्या गप्पा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे शहरात महापालिकेची परिवहन व्यवस्था माेडकळीस आली आहे. परिवहनच्या सेवानिवृत्त कामगारांनी साेमवारी थकीत वेतनासाठी आंदाेलन केले. 

महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५० हून अधिक कामगार साेमवारी सायंकाळी लाल बावटा महानगरपालिका युनियनच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. काॅम्रेड व्यंकटेश कोंगारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना निवेदन दिले. यावेळी तौफिक शेख,  सुरेश बागलकोट, कॉ. अयुब शेख, काँ. सतीश दाभाडे, कॉ. महिबुब शेख, कॉ. अंबादास हुच्चे, कॉ. आसिफ लालकोट आदींचा समावेश होता. 

काॅम्रेड काेंगारी म्हणाले, महापालिकेच्या परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी प्रचंड ओढाताण करावी लागत आहे. महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२३ पासून सातवा वेतन आयोग लागू करणे आला आहे. सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम हा महानगरपालिकेचा एक विभाग असताना परिवहनः उपकमाकडील अधिकारी, कर्मचा-यांना व सेवानिवृत्त कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग लागू करणेत आलेला नाही. ही बाब समस्त परिवहन कर्मचा-यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे महापालिकेच्या विराेधात माेर्चा काढला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर