संपत्तीच्या वाटणीसाठी मुलांनी केली वडिलास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST2021-06-25T04:17:16+5:302021-06-25T04:17:16+5:30

अक्कलकोट : शेती व घराची वाटणी करून देत नसल्याने सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी भैरप्पा विठोबा पुजारी यांना त्यांच्या दोन मुलांनी ...

The children beat up the father for sharing the wealth | संपत्तीच्या वाटणीसाठी मुलांनी केली वडिलास मारहाण

संपत्तीच्या वाटणीसाठी मुलांनी केली वडिलास मारहाण

अक्कलकोट : शेती व घराची वाटणी करून देत नसल्याने सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी भैरप्पा विठोबा पुजारी यांना त्यांच्या दोन मुलांनी मारहाण केल्याचा प्रकार २२ जून रोजी सकाळी ९.३० वाजता बोरी उमरगे येथे घडला.

याप्रकरणी दक्षिण पोलीस ठाण्यात शिवप्रसाद भैरप्पा पुजारी, गुरुप्रसाद भैरप्पा पुजारी (दोघे रा. विजय नगर, अक्कलकोट) या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत भैरप्पा पुजारी (रा. बोरी उमरगे) हे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. भैरप्पा हे मूळगावी राहत आहेत. त्या ठिकाणी मंगळवारी दोन्ही मुले जाऊन आम्हाला घर आणि शेतीमध्ये वाटणी द्या, असे म्हणत असताना भैरप्पा यांच्या आई लक्ष्मीबाई मध्ये पडल्या असता लाकूड व तांब्या फेकून देऊन दोघांनी मारहाण केली. दरम्यान, गावातील लोकांनी सोडवासोडव केली. त्यानंतर भैरप्पा यांची मालकीची कार (एम. एच. १२/ बी. एल. ३५२७) घेऊन निघून गेले.

Web Title: The children beat up the father for sharing the wealth