मुख्यमंत्री आज सोलापुरात

By Admin | Updated: August 17, 2014 23:35 IST2014-08-17T23:35:24+5:302014-08-17T23:35:24+5:30

काँग्रेस भवनातील जिल्हाध्यक्षांच्या नव्या दालनाचे उद्घाटन

Chief Minister of Solapur today in Solapur | मुख्यमंत्री आज सोलापुरात

मुख्यमंत्री आज सोलापुरात


सोलापूर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नेहरू नगर येथे सकाळी १०.३० वाजता काँग्रेस कार्यर्त्यांचा मेळावा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता काँग्रेस भवनातील जिल्हाध्यक्षांच्या नव्या दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे़
जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी कार्यालयाचे नूतनीकरण केले आहे़ यात जिल्हाध्यक्षांचे कक्ष आणि कार्यालय वातानुकूलित करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील सगळ्या गावांचा इतिहास, राजकीय स्थिती, काँग्रेस कार्यकर्त्यांची नावे, त्यांचे संपर्क क्रमांक आदी माहिती एका क्लिकवर मिळण्याची व्यवस्था, वायफाय सुविधा असणार आहे़ उद्घाटन सोहळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा़ अशोक चव्हाण, आ़ प्रणिती शिंदे, आ़ दिलीप माने, माजी मंत्री आनंदराव देवकते, सिद्धाराम म्हेत्रे, प्रकाश यलगुलवार, बाळासाहेब शेळके, धर्मा भोसले आदींची उपस्थित राहणार आहेत.
-----------------------
दोन पुतळ्यांचे अनावरण
सकाळी १० वाजता डफरीन चौक येथे उभारण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे तर १०़३० वाजता नेहरुनगर येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे़ याच ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे़

Web Title: Chief Minister of Solapur today in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.