मुख्यमंत्री म्हणाले; आम्हाला ते पूर्वीचे वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले आनंदी पंढरपूर पहायचंय

By appasaheb.patil | Published: July 20, 2021 04:50 AM2021-07-20T04:50:28+5:302021-07-20T10:47:05+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विठ्ठलाकडे साकडे

The Chief Minister said; We want to see Anandi Pandharpur, which is full of former Warakaris | मुख्यमंत्री म्हणाले; आम्हाला ते पूर्वीचे वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले आनंदी पंढरपूर पहायचंय

मुख्यमंत्री म्हणाले; आम्हाला ते पूर्वीचे वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले आनंदी पंढरपूर पहायचंय

Next

सोलापूर/पंढरपूर : आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला... पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर...आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय अशी हाक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपुरात घातली. 


आषाढी एकादशी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. शासकीय पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचवेळी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिरात आल्यानंतर फक्त विठ्ठल रुक्मिणी मूर्तीकडेच आपण पाहत असतो, परंतु मंदिरातील प्रत्येक खांब, प्रत्येक दगड काहीना काहीतरी बोलत असतो. आज मी परंपरेचा वृक्ष लावला. त्यांची पायेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील असा विश्वास ही ठाकरे यांनी व्यक्त केला. याचवेळी मंदिर समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रतिमांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 


 

Web Title: The Chief Minister said; We want to see Anandi Pandharpur, which is full of former Warakaris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app