मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 13:30 IST2018-12-17T13:28:10+5:302018-12-17T13:30:13+5:30
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज येथे सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर आगमन
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज येथे सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सकाळी साडे दहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते.
यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, महापालिकेचे सभागृह नेता संजय कोळी, भारतीय जनता पक्षाचे शहाजी पवार, प्रा अशोक निंबर्गी, वीरभद्रेश बसवंती, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे आदी उपस्थित होते