शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवजन्मोत्सवाची तयारी... कुर्डूवाडीत एक हजार दिव्यांमधून साकारणार छत्रपतींचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 14:12 IST

कुर्डूवाडी : शिवजयंतीनिमित्त कुर्डूवाडी शहरात विविध मंडळांच्या वतीने शिवजन्मोत्सव, शिवदीपोत्सव, पोवाडा, महिलांची पालखी असे विविध कार्यक्रम होणार आहेत. २१ ...

ठळक मुद्देशिवजयंतीनिमित्त कुर्डूवाडी शहरात विविध मंडळांच्या वतीने शिवजन्मोत्सव, शिवदीपोत्सव, पोवाडा, महिलांची पालखी असे विविध कार्यक्रम होणारशहरातील चौकाचौकात शामियाने, महाराजांना अभिवादन, पोवाडे, महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात येणार

कुर्डूवाडी : शिवजयंतीनिमित्त कुर्डूवाडी शहरात विविध मंडळांच्या वतीने शिवजन्मोत्सव, शिवदीपोत्सव, पोवाडा, महिलांची पालखी असे विविध कार्यक्रम होणार आहेत. २१ फेब्रुवारी रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

शहरातील चौकाचौकात शामियाने, महाराजांना अभिवादन, पोवाडे, महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात येणार आहे. शिवप्रेमींनी आपल्या घरावर व मोटरसायकलला भगवे ध्वज लावले आहेत. शिवजयंतीची तयारी शहरात दोन ते तीन महिन्यांपासून सुरु झाली असून, ठिकठिकाणी बैठका होत आहेत. 

शिवप्रतिष्ठान क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजता आंतरभारती प्रशालेच्या मैदानात कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांचा पोवाडा होणार आहे. सिनेस्टार सत्यानंद गायतोंडे हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या वतीने १९ रोजी पोस्ट रोडला शिवदीपोत्सव सोहळा करण्यात येणार असून, एक हजार दिव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटण्यात येणार आहे. मावळा प्रतिष्ठानच्या वतीने १९ रोजी महिलांची पालखी मिरवणूक, मोटरसायकल रॅली होणार आहे.

श्री संतसेवा मंडळाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा १९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आला असून, यासाठी बनारसहून कलाकार आणण्यात आले आहेत.  कथेत श्रीकृष्णाचे पूर्ण चरित्र सांगण्यात येणार आहे. ही कथा संत सावता माळी यांचे वंशज भागवताचार्य ह. भ. प. प्रकाश महाराज वृंदावनवासी शिंदखेडा-धुळे हे सांगणार असल्याचे संत सेवा मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

शिवभक्तांच्या उत्साहाला आले उधाण- महाराजांसारखी दाढी ठेवण्याची व कपाळावर चंद्रकोर काढण्याची क्रेझ तरुणांत वाढत असून, अनेकांनी आपल्या दाढीच्या आकाराची स्टाईल त्या पध्दतीने केली आहे. यासाठी त्यांची खास सलूनवाल्याकडूनच दाढी कोरण्यासाठी गर्दी वाढत आहे. शिवभक्तांमध्ये सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंती