चतुराबाई शिंदे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST2021-07-30T04:23:55+5:302021-07-30T04:23:55+5:30

सोलापूर : चतुरबाई देऊ शिंदे (९०) यांचे निधन झाले आहे. सिंडिकेट बँकेचे निवृत्त शाखा व्यवस्थापक परमेश्वर शिंदे यांच्या त्या ...

Chaturabai Shinde passed away | चतुराबाई शिंदे यांचे निधन

चतुराबाई शिंदे यांचे निधन

सोलापूर : चतुरबाई देऊ शिंदे (९०) यांचे निधन झाले आहे. सिंडिकेट बँकेचे निवृत्त शाखा व्यवस्थापक परमेश्वर शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

गोरखनाथ काकडे

सोलापूर : गोरखनाथ तुकाराम काकडे (८०, रा. उमा नगरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

मारुतीराव साठे

सोलापूर : सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी मारुतीराव शंकरराव साठे (९०, रा. प्रेरणा सोसायटी, विजापूर रोड) यांचे निधन झाले. शहर काँग्रेसचे बी ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे यांचे ते वडील होत.

रमेश शिंदे

सोलापूर : सहायक फौजदार रमेश त्रिंबक शिंदे (५३, रा. अरविंद धाम वसाहत) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, आई, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. सकल मातंग समाजाचे शहर अध्यक्ष सुहास शिंदे यांचे ते बंधू होत.

शांताबाई पोतदार

सोलापूर : शांताबाई शंकर पोतदार (८०, रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Chaturabai Shinde passed away