स्वच्छ कारभारासाठी सोलापूर बाजार समितीत परिवर्तन होणे आवश्यक -  सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:29 PM2018-05-22T12:29:03+5:302018-05-22T12:29:03+5:30

सोलापूर बाजार समितीच्या धर्तीवर भाजप कार्यकर्त्यांची बैठक

Changes in the Solapur Bazar Samity for Clean Governance - Subhash Deshmukh | स्वच्छ कारभारासाठी सोलापूर बाजार समितीत परिवर्तन होणे आवश्यक -  सुभाष देशमुख

स्वच्छ कारभारासाठी सोलापूर बाजार समितीत परिवर्तन होणे आवश्यक -  सुभाष देशमुख

Next
ठळक मुद्देभाजपाच्या दक्षिण व  उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकबाजार समितीचा कारभार भविष्यात आॅनलाईन होणारचांगले संचालक निवडून येणे आवश्यक - देशमुख

सोलापूर : स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी बाजार समितीत परिवर्तन होणे आवश्यक असून, लोकमंगल परिवारातील कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही, शिवाय उमेदवार लादणारही नाही, कार्यकर्त्यांनी निवडलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे मी उभा राहीन, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या धर्तीवर भाजपाच्या दक्षिण व  उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सोलापूर बाजार समितीचा कारभार भविष्यात आॅनलाईन होणार असून चांगले संचालक निवडून येणे आवश्यक असल्याचे सहकारमंत्री देशमुख म्हणाले.

आजवर ठराविक कार्यकर्त्यांच्या पै-पाहुण्यांच्या जीवावर संचालक होऊन मर्यादित लोकांसाठी कारभार करणाºयांचे दिवस आता शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्याने संपले असल्याचे सहकारमंत्री म्हणाले. बाजार समिती ही शेतकºयांना न्याय देण्यासाठीचे ठिकाण असल्यानेच शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. डॉ. चनगोंडा हविनाळे  यांनी आतापर्यंत शेतकºयांना  व्यापाºयांनी लुटले असून  दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध दिशेला तोंडे असलेले नेते सत्तेसाठी एकत्र आल्याचा आरोप केला. सत्तेसाठी एकत्र आलेले नेते खासगीत काय बोलतात हे सर्वांना माहीत आहे, अशांवर दक्षिणचे शेतकरी विश्वास ठेवणार नाहीत असे डॉ. हविनाळे म्हणाले.

आतापर्यंत सुभाष बापूंनी उमेदवारी कोणाला द्यावी हे कधी सांगितले नाही, आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच उमेदवारी देतो, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही निवडलेल्या उमेदवाराचा बापूंनी प्रचार केला होता, असे भाजपाचे उत्तर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम यांनी सांगितले. आतापर्यंत मोजक्या मताच्या जीवावर संचालक होणाºयांना आता शेतकºयांच्या पाया पडावे लागणार आहे, दक्षिण व उत्तरचे शेतकरी नक्कीच परिवर्तन करतील व चांगले संचालक निवडून देतील असे पाथरीचे माजी सरपंच श्रीमंत बंडगर म्हणाले. दक्षिणचे अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांनी कार्यकर्त्यांनी त्यागाची भूमिका ठेवावी, कोणीही उमेदवार असला तरी विजयासाठी परिश्रम घ्यावे असे यावेळी बोलताना सांगितले.

पंचायत समिती सदस्य एम.डी. कमळे यांचेही यावेळी भाषण झाले. बैठकीला जि.प. सदस्य आण्णाप्पा बाराचारे, शिरीष पाटील, हणमंत कुलकर्णी, सिद्धाराम हेले, मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, लोकमंगल पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, केदार विभुते, धर्मा राठोड, संभाजी भडकुंबे, संजय भोसले, सुनील गुंड, सतीश लामकाने, नंदू पवार, ज्ञानू बंडगर, अमोल घोडके, विजय स्वामी, राम गुंड, संभाजी दडे, वसंत साखरे, इनायतअली जहागीरदार, प्रभाकर फुलसागर, संजय इनामदार, नितीन गरड, घनशाम गरड, शिवाजी पाटील, शिवाजी घोडके, सुरेश व्हनमोटे, विनायक सुतार, सुहास भोसले, मोहन काळे, पिंटू जाधव, विनोद पवार, सचिन भिंगारे, संदीप सुरवसे आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

कार्यकर्त्यांच्या उमेदवारीचा विचार
- आमच्या संस्थेत कामाला आहे म्हणून उमेदवारी, ऐकण्यात असेल तरच उमेदवारी, असे आमच्याकडे होत नाही. गावच्या कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी देतो, असे भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम म्हणाले, परंतु दिलेला उमेदवार बापू आहे असे समजूनच कार्यकर्त्यांनी काम करावे असे कदम म्हणाले. 

Web Title: Changes in the Solapur Bazar Samity for Clean Governance - Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.