शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

By appasaheb.patil | Updated: September 30, 2022 19:12 IST

७ ते १० ऑक्टोबरपर्यंत राहणार बदल; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे आदेश

सोलापूर : कोजागिरी आणि मंदिर पौर्णिमा यानिमित्त तुळजापूरकडे पायी चालत जाणाऱ्या भाविकांची गर्दी होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे ७ ऑक्टोबर २०२२ रोजी कोजागिरी पौर्णिमा व १० ऑक्टोबर २०२२ रोजी मंदिर पोर्णिमा यादरम्यान वाहन चालकांसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

सोलापूर शहर, जिल्ह्यातील, कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूरकडे पायी चालत जात असल्याने वाहतुकीची कोंडी होवू नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी भाविक पायी चालत जाणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहेत.  भाविकांचे सुरक्षिततेच्या कारणावरुन खालीलप्रमाणे वाहतुक मार्गात बदल करण्यात  आले आहेत. ७ ऑक्टोबर २०२२ रोजीपासून १० ऑक्टोबर २०२२ रोजीचे २४ वा. दरम्यान खालील मार्गावरून पथक्रमण करण्यास अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात येत आहे.

--------------पथक्रमण करण्यास मनाई करण्यात आलेले मार्ग

तुळजापूर ते सोलापूरकडे येणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात आली आहे. सोलापूर ते तुळजापूरकडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर या दरम्यान मनाई करण्यात आली आहे. तुळजापूर ते बार्शीकडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास तुळजापूर, ढेकरी, गौडगाव, बार्शी या दरम्यान मनाई करण्यात आली आहे. बार्शी ते तुळजापूरकडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शी, गौडगाव, ढेकरी, तुळजापूर या दरम्यान मनाई करण्यात आली आहे.

------------या मार्गावरील वाहने खालीलप्रमाणे मार्गक्रमण करतील तुळजापूर ते सोलापूरकडे येणारी वाहतुक मंगरुळपाटी हटकल, बोरामणी मार्ग पथक्रमण करतील. सोलापूर ते तुळजापूरकडे जाणारी वाहतुक बोरामणी, इटकळ -मंगरुळपाटी मार्ग पराक्रमण करतील. तुळजापूर ते बार्शीकडे येणारी वाहतुक तुळजापूर, उस्मानाबाद, पैराम, बार्शी मार्ग पथक्रमण करतील.  बार्शी ते तुळजापूरकडे जाणारी वाहतुक बाशी, वैराग, उस्मानाबाद, तुळजापूर मार्ग पथक्रमण करतील.

-------

अत्यावश्यक वाहनांना बंदी नाही

पोलीस, रुग्ण सेवा, अग्निशमन दलाचे वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच एस. टी. बसेस या वाहनांना ही बंधने लागू राहणार नाहीत. ७ ऑक्टोबर २०२२ रोजीपासून १० ऑक्टोबर २०२२ रोजीचे २४ वा. दरम्यान तुळजापूर घाट हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद असणार आहे, याबाबतचे आदेश श्रीमती सातपुते यांनी जाहीर केले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरtuljapur-acतुळजापूरNavratriनवरात्रीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस