चंद्रशेखर जेऊरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:19 IST2021-04-26T04:19:18+5:302021-04-26T04:19:18+5:30

सोलापूर : ह.दे. प्रशालेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक चंद्रशेखर जेऊरकर (८५, रा. अकलूज, ता. माळशिरस) यांचे शनिवारी रात्री पुण्यात निधन झाले. ...

Chandrasekhar Jeurkar passed away | चंद्रशेखर जेऊरकर यांचे निधन

चंद्रशेखर जेऊरकर यांचे निधन

सोलापूर : ह.दे. प्रशालेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक चंद्रशेखर जेऊरकर (८५, रा. अकलूज, ता. माळशिरस)

यांचे शनिवारी रात्री पुण्यात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पोटावर महिन्यापूर्वी पुण्यात शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातू, असा परिवार आहे. भूगोल, गणित आणि विज्ञान, या विषयांत त्यांचा हातखंडा होता. एन.सी.सी.चे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. कडक शिस्तीचे भोक्ते असलेले जेऊरकर गरीब विद्यार्थ्यांना स्वत:च्या घरी बोलावून मोफत शिकवत.

राहुल लोहकरे

अकलूज : राहुल सुरेश लोहकरे (४८, रा. अकलूज, ता. माळशिरस) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन भाऊ, भावजय, असा परिवार आहे. ते सिव्हिल इंजिनिअर म्हणून मुंबई, जयपूर, नागपूर आणि चार वर्षांपासून दिल्ली येथे नोकरी होते.

राजेंद्र कासार

सोलापूर : राजेंद्र पद्मना कासार (६०, रा. कुमठे, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले व दोन मुली, असा परिवार आहे.

रघुनाथ बनसोडे

टेंभुर्णी : येथील प्रेस क्लबचे माजी सचिव व पत्रकार रघुनाथ भुजंगराव बनसोडे (४९, रा. टेंभुर्णी, ता. माढा) यांचे कोरोनाने निधन झाले. अकलूज येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, दोन भाऊ व बहीण, असा परिवार आहे.

Web Title: Chandrasekhar Jeurkar passed away