केंद्राचं पथक सोलापुरात; सकाळपासूनच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी

By आप्पासाहेब पाटील | Updated: November 5, 2025 10:26 IST2025-11-05T10:25:01+5:302025-11-05T10:26:46+5:30

नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे चार सदस्यीय पथक पाहणी करण्यासाठी सोलापुरात

Central team in Solapur Direct inspection of heavy rain and flood affected areas since morning | केंद्राचं पथक सोलापुरात; सकाळपासूनच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी

केंद्राचं पथक सोलापुरात; सकाळपासूनच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात माहे सप्टेंबर २०२५ मध्ये जवळपास सात तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे चार सदस्यीय पथक आज पाहणी करण्यासाठी सोलापुरात आले. बुधवारी सकाळपासूनच या पथकाने  सोलापूर येथून वडकबाळ, हत्तुर, तिऱ्हे, शिवणी व सोलापूर येथील शेती, घरं, रस्ते, महावितरणचे उपकेंद्र तसेच बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

केंद्रीय पथकात केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता.

पथकाने हिरज, हत्तूर परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरस्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मदने यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Web Title : केंद्र सरकार की टीम ने सोलापुर में बाढ़ प्रभावित क्षेत्रों का निरीक्षण किया

Web Summary : केंद्र सरकार की एक टीम ने सोलापुर के सात तालुकों में बाढ़ से हुए नुकसान का आकलन करने के लिए दौरा किया। उन्होंने खेतों, घरों, सड़कों और बिजली के बुनियादी ढांचे का निरीक्षण किया, प्रभावित किसानों से बातचीत की और जिला कलेक्टर से बाढ़ की स्थिति के बारे में जानकारी एकत्र की।

Web Title : Central Team Inspects Flood-Affected Areas in Solapur

Web Summary : A central government team visited Solapur to assess flood damage in seven talukas. They inspected farms, homes, roads, and power infrastructure, interacting with affected farmers and gathering information from the District Collector about the flood situation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.