शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हॅपी न्यूज ईयर; सेलिब्रेटी अन् अभिनेते करणार सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिराचे ब्रँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 14:59 IST

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : तलावाच्या मधोमध असलेले श्री सिद्धरामेश्वरांचे मंदिर... भोवताली ऐतिहासिक भुईकोट किल्ला... निसर्गरम्य वातावरणातील ‘ए टेम्पल इन ...

ठळक मुद्देविविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार सोलापुरात आले तर त्यांना नक्कीच पंच कमिटीकडून आमंत्रण दिले जाईल - देवस्थान पंच कमिटीत्यांना दर्शनासाठी आणले जाईल. जेणेकरुन भाविक, पर्यटक कसे वाढतील, याचा नक्कीच विचार करु - देवस्थान पंच कमिटी

रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : तलावाच्या मधोमध असलेले श्री सिद्धरामेश्वरांचे मंदिर... भोवताली ऐतिहासिक भुईकोट किल्ला... निसर्गरम्य वातावरणातील ‘ए टेम्पल इन वॉटर’च्या प्रचार अन् प्रसारावर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी भर देणार असून, या नव्या संकल्पामुळे नेते, अभिनेते, विविध क्षेत्रांमधील नामवंत कलाकार आदींना यापुढे मंदिरात आणण्याचा संकल्प पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सोडला.

देशातील काही प्रमुख राज्यांना जोडणारे सोलापूर रेल्वे स्थानक हे प्रमुख केंद्र आहे. आंध्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या या शहरापासून काही अंतरावर तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे आहेत. दर्शनाच्या निमित्ताने दररोज असंंख्य भाविक सोलापुरात येत असतात. चादरी, टॉवेल्स उत्पादनामुळे परप्रांतातील व्यापारीही सोलापूर भेटीवर असतात. इथले आपले काम आटोपून भाविक, व्यापारी पुढे दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी, तुळजामाता, स्वामी समर्थ आणि गाणगापूरला रवाना होतात.

सोलापुरातील निसर्गरम्य वातावरणातील ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे पाण्यातील भव्य मंदिराची त्यांना कल्पनाच नसते. राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नेते, सेलिब्रिटी, कलावंत सोलापुरातून पुढे मार्गस्थ होताना त्यांना देवस्थान समितीकडून आमंत्रण मिळते. दर्शन घेतल्यावर त्यांचा यथोचित सन्मानही होतो. त्याच पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीही नव्या वर्षात हा उपक्रम राबविणार आहे. 

बाळासाहेब भोगडे यांनी ही जबाबदारी घेतली असून, पंच कमिटीतील कर्मचाºयांच्या माध्यमातून हा नवा संकल्प तडीस देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास सोलापूरचे नाव सातासमुद्रापलीकडे जाईल, हे मात्र निश्चित.

ये तो सुवर्ण मंदिरसे बेहतरीन है -आडवाणी- भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी हे मागे सोलापूर दौºयावर आले असता त्यांनी श्री सिद्धरामेश्वर मंदिरास आवर्जून भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ‘ये तो सुवर्ण मंदिरसेही बेहतरीन है !’ असे गौरवोद्गार काढले होते. नामवंत व्यंगचित्रकार स्व. आर. के. लक्ष्मणही हेही मंदिरात आले होते. त्यांना एक कार्यक्रम आटोपून पुढे निघायचे होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना केवळ पाच मिनिट द्या, अशी विनंती करताच ते तयारही झाले. मात्र जेव्हा ते मंदिरात आले तेव्हा ते अर्धातास सभा मंडपात ध्यानात रमून गेले.

विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार सोलापुरात आले तर त्यांना नक्कीच पंच कमिटीकडून आमंत्रण दिले जाईल. त्यांना दर्शनासाठी आणले जाईल. जेणेकरुन भाविक, पर्यटक कसे वाढतील, याचा नक्कीच विचार करु. -बाळासाहेब भोगडे,सदस्य- श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्राSiddheshwar Templeसिध्देश्वर मंदीर