राळेरासमध्ये वाळूचा ट्रॅक्टर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:21 IST2021-02-14T04:21:09+5:302021-02-14T04:21:09+5:30
वैराग : राळेरास (ता. बार्शी) येथील नागझरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करुन घेऊन जात असताना पोलिसांनी ट्रॅक्टर पकडला. याबाबत ...

राळेरासमध्ये वाळूचा ट्रॅक्टर पकडला
वैराग : राळेरास (ता. बार्शी) येथील नागझरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करुन घेऊन जात असताना पोलिसांनी ट्रॅक्टर पकडला. याबाबत वैराग पोलिसांनी गुन्हा ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत सात हजार रुपयांची एक ब्रास वाळू जप्त केली असून शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास वैराग पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर चालक किशोर महादेव घोंगाने (२४, रा. दहिटणे, ता. बार्शी )
त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी पोलिसांचे एक पथक गस्त घालत होते. वाळू घेऊन निघालेला ट्रॅक्टर राळेरास हद्दीत पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर शिंदे यांच्या निदर्शनास आला. पोलिसांना पाहताच त्या चालकाने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील वाळू जागेवर उतरवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करुन ट्रॅक्टरसह चालकाला ताब्यात घेतले. सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.