शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरट्यास पकडले; पाच दुचाकी, दोन रिक्षा सांगोला पोलिसांनी केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 15:38 IST

सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दुचाकी चोरास पकडून मुसक्या आवळल्या

सांगोलासांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दुचाकी चोरास पकडून मुसक्या आवळल्या. या दुचाकी चोराकडून अनेक दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान,  सांगोला शहर व तालुक्यातून  वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची दखल घेवून पोलीस दुचाकी चोरांचा शोध घेत असताना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व अद्यावत तपास यंत्रणेच्या मदतीने  दुचाकी चोरास रिक्षासह रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून पाच दुचाकी, दोन रिक्षा असा सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर चोरीला गेलेल्या  दुचाकी व रिक्षा मालकांनी सांगोला पोलीस स्टेशनशी आवश्यक कागदपत्रासह संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली  सांगोला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश  यमगर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता वजाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल आप्पासाहेब पवार,  पोलीस नाईक  राहुल कोरे, पोलीस नाईक अभिजीत मोहोळकर, पोलीस नाईक सुखदेव  गंगणे , पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, पोलीस नाईक सचिन हेंबाडे, पोलीस काॅन्सटेबल धुळा चोरमले, सायबर सेलचे पोलीस काॅन्सटेबल अन्वर अत्तार  यांनी केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक राहुल देवकाते करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसThiefचोरsangole-acसांगोलाCrime Newsगुन्हेगारी