शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या या आमदाराचा जातीचा दाखला बोगस; शिवसेनेना घेतला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 15:15 IST

मोहोळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल; नागपूर खंडपीठात याचिका दाखल होणार

सोलापूर : खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट जातीचा दाखला प्राप्त करून  आमदार यशवंत माने यांनी शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे़ संबंधित आमदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा व कोर्टाने  जातपडताळणी समितीने उचित कारवाई करून त्यांचे आमदारपद काढून घ्यावे, अशी मागणी शिवसेनेचे सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.

दरम्यान, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती गटातून निवडणुकीस उभे होते़ शिवसेनेच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव करून विजयी झाले़ त्या निवडणुकीसाठी दाखल केलेला जातीचा दाखला हा बनावट कागदपत्रांच्या आधारावर मिळविला आहे़ आमदार माने हे हिंदू कैकाडी जातीचे असून, ही जात विदर्भात जाती संवर्गात येते. मात्र उर्वरित महाराष्ट्रात विमुक्त जाती संवर्गात आहे.

माने हे इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी आहेत़ मात्र त्यांनी स्वत:च्या जातीचा दाखला चिखली (ता़ चिखली, जि. बुलडाणा) येथील रहिवासी असल्याची बनावट कागदपत्रे देऊन मिळविला.

मोहोळ मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असताना माने या प्रवर्गात येत नसताना त्यांनी बनावट कागदपत्रे जमा करून जातीचा दाखला मिळविला़ ही एकप्रकारे शासनाची व जनतेची फसवणूक व अनुसूचित जातीच्या सदस्यांवर अन्याय करणारी बाब आहे़ तरी संबंधित मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयाने व जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने माझ्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. माझ्याविषयी केलेल्या तक्रारीची मला कल्पना नाही़ तक्रारदारांनी माझ्यासमोर येऊन तक्रार सांगितल्यास मी कसा बरोबर आहे ते सांगेऩ मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने सध्या या विषयावर बोलणे टाळतो़ याबाबत नंतर उत्तर देईऩ    - यशवंत माने, आमदार, मोहोळ

आमदार यशवंत माने यांनी बनावट जातीच्या दाखल्याद्वारे जनतेची व शासनाची फसवणूक केली आहे़ याबाबत मोहोळ पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार आहे़ माझ्या तक्रारीची उचित व योग्य ती कार्यवाही व्हावी़    - सोमेश क्षीरसागर,    शिवसेना कार्यकर्ता, मोहोळ

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदारfraudधोकेबाजीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस