सोलापूरच्या निवडणुकीत ‘कास्ट फॅक्टर’ ठरणार प्रभावी
By Admin | Updated: January 30, 2017 14:49 IST2017-01-30T14:49:21+5:302017-01-30T14:49:21+5:30
सोलापूरच्या निवडणुकीत ‘कास्ट फॅक्टर’ ठरणार प्रभावी

सोलापूरच्या निवडणुकीत ‘कास्ट फॅक्टर’ ठरणार प्रभावी
सोलापूरच्या निवडणुकीत ‘कास्ट फॅक्टर’ ठरणार प्रभावी
ाहेश कुलकर्णी - सोलापूर आॅनलाईन लोकमत
निवडणुकीच्या रणांगणात अनेक छोटे-मोठे पक्ष आपली ताकद आजमावत असले तरी कुठल्याही निवडणुकीचे मुख्य गणित हे जातीवर आधारित असते. जातनिहाय मतदाराचा अभ्यास करून त्या भागात बहुसंख्य असलेल्या जातीला उमेदवार देऊन विजयाचे गणित घातले जाते. सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या सर्वाधिक आहे. सात तालुक्यांमध्ये या समाजाचे वर्चस्व असून इतर चार तालुक्यांमध्ये अन्य समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत.
मराठा, धनगर आणि लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पूर्वीपासून जातीच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व होते. बदलत्या राजकीय वातावरणात प्रत्येक समाजाने आपापल्या संघटना स्थापन करून सत्तेत वाटा कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले. कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने काढलेल्या क्रांती मोर्चामुळे समाज एकवटला आहे, परंतु या एकीचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला मिळेल ते सांगणे सध्या तरी अवघड आहे. सर्वच पक्षात मराठा समाजाचे पुढारी असल्याने आणि संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांनीही निवडणूक लढण्याचे जाहीर करून राजकारणात उडी घेतल्याने हा समाज नेमका कोणाच्या बाजूने जाणार याबाबत काही सांगणे कठीण आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाने एकत्र येऊन जिल्ह्यात सर्वत्र आक्रोश मोर्चे काढले आहेत. त्या समाजाचे एकत्रित मतदान होणार की जातनिहाय मतदान होऊन वेगवेगळ्या पक्षांच्या पारड्यात पडणार हे मतदानानंतरच कळेल.
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकावर धनगर समाज आहे. या समाजाने गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन मतदान केले होते. माळशिरस आणि सांगोला या दोन तालुक्यात धनगर समाजाची मोठी ताकद आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या लिंगायत समाजाने सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमध्ये नेहमीच पकड ठेवली. एकेकाळी काँग्रेससोबत असलेला हा समाज सध्या भाजपाबरोबर असल्याने यंदाच्या निवडणुकीत त्याचा काय परिणाम होईल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
तालुकानिहाय समाजाचे वर्चस्व
करमाळा़़़
तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, माळी, मागासवर्गीय व मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक समाज आहे. मराठा समाजच या तालुक्याचे राजकीय समीकरणे बदलवतो.
माढा़़़
तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल माळी, मुस्लीम आणि धनगर समाज आहे. मराठा समाजच या तालुक्याचे राजकीय समीकरणे बदलवतो.
पंढरपूर...
तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, मागासवर्गीय, मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक समाज आहे. मराठा समाजच या तालुक्याचे राजकीय नेतृत्व करतो.
सांगोला़़़़
तालुक्यात धनगर समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल मराठा, लिंगायत आणि मुस्लीम समाज आहे. धनगर समाज तालुक्याचे नेतृत्व करतो.
माळशिरस़़़़
धनगर समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल माळी, मराठा, मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक समाज आहे. मराठा समाजाकडे सत्ता आहे.
उत्तर सोलापूऱ़़़़़़़
उत्तर सोलापूर तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, मुस्लीम, माळी, लिंगायत आणि मागासवर्गीयांची संख्या आहेत. मराठा समाजाकडे सत्ता आहे.
दक्षिण सोलापूऱ़़़़़़़़़
दक्षिण तालुक्यात लिंगायत समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, मुस्लीम आणि मराठा समाज आहे. लिंगायत समाज तालुक्याचे नेतृत्व करतो.
बार्शी़़़़़़़़़़
तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल वंजारी, मुस्लीम, धनगर, माळी समाजाची मते आहेत. मराठा समाज तालुक्याचे राजकारण ठरवतो.
मंगळवेढा ़़़़़़़़़़़
तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाज आहे. लिंगायत आणि धनगर समाज निर्णायक ठरतो.
मोहोऴ़़़़़़़़़़
तालुक्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धनगर, मुस्लीम, माळी, लिंगायत आणि मागासवर्गीयांची संख्या अधिक आहे. इतर समाजाची संख्या अधिक असली तरी राजकीय सूत्रे मराठा समाजाकडे आहेत
अक्कलकोट़़़़़़़़़़़़़़.
तालुक्यात लिंगायत समाज सर्वाधिक आहे. त्याखालोखाल मुस्लीम आणि मागासवर्गीय समाज आहे. लिंगायत समाज तालुक्याचे नेतृत्व करतो.