बदलीनंतर रुजू न झालेल्या अभिजित बापट यांच्यावर गुन्हा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 17:58 IST2020-06-04T17:57:51+5:302020-06-04T17:58:15+5:30
सोलापूर मनपा आयुक्तांची माहिती : एक वर्षापूर्वी झाली होती, सोलापूरकडे फिरकलेच नाहीत

बदलीनंतर रुजू न झालेल्या अभिजित बापट यांच्यावर गुन्हा दाखल करणार
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क
सोलापूर : बदलीनंतरही महापालिकेच्या उपायुक्तपदी रुजू न झालेले अधिकारी अभिजीत बापट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी दिले.
अभिजित बापट पंढरपूरचे नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. मागील वर्षी त्यांची सोलापूर मनपा उपायुक्त म्हणून बदली झाली होती. बापट रुजू झाले नाही.
काही दिवसानंतर त्यांना सांगली जिल्हातील पूरस्थितीच्या कामासंदर्भात नियंत्रक म्हणून बोलावण्यात आले होते. पूरस्थिती ओरसल्यानंतरही बापट सोलापुरात आले नाहीत. त्यांच्यावर आता आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हा दाखल होणार आहे