शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कारंबा शिवारातील दरोडा उघडकीस, चार आरोपींना केले जेरबंद

By appasaheb.patil | Updated: February 24, 2019 17:10 IST

सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कारंबा शिवारातील दरोडा उघडकीस आणण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ...

ठळक मुद्दे- सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी- २ लाख ७ हजार ८२५ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला -  दत्तात्रय बहिर्जे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती

सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कारंबा शिवारातील दरोडा उघडकीस आणण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे़ या दरोड्यात वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनासह ३८ हजार ८२५ रुपये किमतीच्या स्टीलच्या सळया असा २ लाख ७ हजार ८२५ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी चार आरोपींना जेरबंद केले आहे.

भीमाशंकर हणमंतू ठणकेदार (वय ३७, रा़ मड्डी वस्ती, जुना तुळजापूर नाका, सोलापूर), रामा उर्फ रामचंद्र चंदू काळे (वय ३०, रा. नरोटेवाडी, ता़ उ़ सोलापूर), किरण शिवाजी काळे (वय २५), सुखदेव शिवाजी काळे (वय २८, रा़ मार्डी, ता़ उ़ सोलापूर) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कारंबा (ता़ उ़ सोलापूर) येथील दत्तात्रय अण्णाप्पा बहिर्जे (वय ५८) यांच्या नवीन घराचे बांधकाम चालू होते़ २ फेबु्रवारी रोजी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात वीस ते तीस वयोगटातील अज्ञात चोरट्यांनी त्यांना मारहाण व शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन ३८ हजार ८२५ रुपये किमतीच्या स्टीलच्या सळया जबरीने घेऊन गेले होते़ याबाबत दत्तात्रय बहिर्जे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचारी हे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्यात अज्ञात आरोपींच्या मागावर होते़ त्याच दरम्यान, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मड्डी वस्ती येथील भिमाशंकर ठणकेदार यास १९ फेबु्रवारी रोजी ताब्यात घेतले़ भिमाशंकर ठणकेदार याची कसून चौकशी करण्यात आली़ त्यावेळी अन्य नावे सांगितली.  या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे हे करीत आहेत.

सोमवारपर्यंत कोठडी- दरोडा टाकणाºया चौघा आरोपींना सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना २५ फेबु्रवारी २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारीThiefचोर