कार पलटी होऊन उपळाईजवळ युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:29+5:302021-06-18T04:16:29+5:30
माढा : सोलापूर-माढा रस्त्यावर उपळाई खुर्द परिसरात एका हॉटेलजवळ भरधाव वेगातील कार पलटी होऊन तुकाराम बबन गोसावी (वय २५, ...

कार पलटी होऊन उपळाईजवळ युवक ठार
माढा : सोलापूर-माढा रस्त्यावर उपळाई खुर्द परिसरात एका हॉटेलजवळ भरधाव वेगातील कार पलटी होऊन तुकाराम बबन गोसावी (वय २५, रा. शिराळा, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद) हा युवक गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावला.
गुरुवार, १७ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. उपळाई खुर्द शिवारात एका हाॅटेलच्या वळणावर भरधाव कार (एम. एच. १२, के. एन. ४४४०) चा वेग कमी होऊ शकला नाही. ही कार तीन वेळा पलटी झाली. अपघातात तुकाराम गोसावी हा युवक गंभीर जखमी झाला. त्यास उपचारास रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी मांजरे यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक फौजदार तागडे करीत आहेत.