टायर फुटल्याने कार उलटली

By Admin | Updated: July 29, 2014 01:15 IST2014-07-29T01:15:08+5:302014-07-29T01:15:08+5:30

चिखर्डेजवळील घटना : एक ठार, तीन जखमी

The car came down after the tire broke | टायर फुटल्याने कार उलटली

टायर फुटल्याने कार उलटली


कुसळंब : उस्मानाबाद-बार्शी राज्यमार्गावर चिखर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ कारचे टायर फुटून ती उलटली़ त्यात चालक जागीच ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले़ ही घटना २७ जुलै रोजी रात्री ११़२५ वाजता घडली़
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रशांत वालवडकर हे २७ रोजी बार्शी येथून निलंगा येथे कार्यक्रमासाठी गेले होते़ ते परत बार्शीकडे येत असताना चिखर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आले असता काकासो माणिक पाटील यांच्या शेतात कारचे (एम़ एच़ १२ ए़ एफ़ ८२७३) पुढचे टायर फुटले़ त्यामुळे कार तीन वेळा पलटी झाली़
या अपघातात चालक प्रशांत मल्लिकार्जुन वालवडकर (वय ४५, सुभाषनगर, बार्शी) यांच्या छातीला स्टेअरिंगचा मार लागून जागीच ठार झाले़ त्यांची पत्नी सरिता प्रशांत वालवडकर, गौरी बसवराज स्वामी , सुमन सर्जेराव गाढवे या तीन महिला जखमी झाल्या़ त्यांना बार्शी येथील मामासाहेब जगदाळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ यात केवळ सचिन पाटील यांना कुठली दुखापत झाली नाही़
या घटनेची नोंद पांगरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली़ या अपघाताची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड, बिराजदार, गोसावी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़ त्यानंतर त्याचा पंचनामा केला़

Web Title: The car came down after the tire broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.