बार्शीत साडेपाचशे बेडची क्षमता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:47+5:302021-04-15T04:21:47+5:30

बार्शी तालुक्यात आजवर १ लाख ४ हजार १८१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ८ हजार २७४ पॉझिटिव्ह आढळून ...

The capacity of five hundred and fifty beds will be increased in Barshi | बार्शीत साडेपाचशे बेडची क्षमता वाढणार

बार्शीत साडेपाचशे बेडची क्षमता वाढणार

Next

बार्शी तालुक्यात आजवर १ लाख ४ हजार १८१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ८ हजार २७४ पॉझिटिव्ह आढळून आले. यात ३१८ जणांचा मृत्यू झाला.

यामध्ये बार्शी शहरात २९९ तर ग्रामीण भागात २१८ रुग्ण आहेत. उर्वरित रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली.

या पाच दिवसांत ५ हजार ९५२ जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.

----

तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटर व हॉस्पिटलमध्ये एकूण बेड क्षमता ही ८८३ आहे. यामध्ये ५२८ जण उपचार घेत आहेत. यात कोविड केअर सेंटरमध्ये २२८, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १९३ तर हेल्थ केअर सेंटरमध्ये १२२ रुग्ण आहेत.

----

आता केवळ ३८ बेड शिल्लक

बार्शीत असलेल्या ८ कोविड हॉस्पिटलमध्ये मिळून आयसीयू बेड ९०, ऑक्सिजन बेड १२५, आयसोलेशन बेड ८९ आहेत. सध्या आयसीयूमध्ये १३४ ऑक्सिजनचे ११६ तर आयसोलेशनचे ७१ बेड फुल्ल झालेले आहेत. सर्व मिळून ३८ बेड शिल्लक आहेत.

---

आणखी दोन हेल्थ केअर सेंटर सुरू

बार्शीत नव्याने मंजुरी मिळालेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये डॉ. गणेशकुमार सातपुते यांनी फिजिओथेरपी डॉ. करगल यांच्या हॉस्पिटलमध्ये ४० बेडचे हॉस्पिटल सुरू केले आहे. त्याचे शैलजा हॉस्पिटल हे नॉन कोविड रुग्णांसाठी सुरू राहणार आहे. तसेच सावळे सभागृहात डॉ. योगेश कुलकर्णी आणि डॉ. योगेश सोमाणी यांचे २० बेडचे हॉस्पिटलही सुरू झाले आहे.

---

येत्या दोन दिवसांत ५१० बेड वाढणार

तालुक्यातील सातही प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी ५० बेडच्या कोविड केअर सेंटरला मंजुरी मिळाली आहे. एकंदरीत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ४०, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ११० तर कोविड केअर सेंटरमध्ये ४०० वाढीव बेड उपलब्ध होणार आहेत.

---

सहा दिवसांत केवळ १८१० जणांचे लसीकरण

तालुक्यात २४ हजार ९२६ जणांनी लसीचा पहिला डोस तर ३२६९ जणांनी दुसरा असे एकूण २९ हजार १९५ नागरिकांनी लसीचा डोस घेतला आहे. ८ एप्रिल रोजी तालुक्यात २६ हजार ३८५ जणांनी लस घेतली होती, तर या सहा दिवसांत लसीच्या तुटवड्यामुळे केवळ १८१० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. बुधवारीही लस उपलब्ध नव्हती.

---

दहा तालुक्यांतील रुग्ण बार्शीत

रेमडेसिविरचा पुरवठा वाढवा

बार्शीत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि हेल्थ सेंटरची संख्याही आता १० वर पोहचली आहे. बार्शीत डॉक्टरांची संख्या जास्त आहे. तसेच सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यांतील जवळपास १० तालुक्यांतील रुग्ण उपचारासाठी बार्शीत येत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून बार्शीत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. बार्शीची रुग्णसंख्या विचारात घेता तालुका हा निकष न लावता बार्शीत रुग्ण किती उपचार घेत आहेत, याची आकडेवारी पाहून जास्तीत जास्त इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आ. राजेंद्र राऊत यांनी केली आहे.

Web Title: The capacity of five hundred and fifty beds will be increased in Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.