शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयाची गणिते जुळता जुळेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:56 AM

नेत्यांचे आदेश स्थानिक कार्यकर्त्यांनी डावलले; प्रत्यक्षात मतमोजणीनंतर कोणाचा दावा खरा ठरणार हे स्पष्ट होईल

ठळक मुद्देबहुचर्चित माढा मतदारसंघात लोकसभेसाठी चुरशीने ६३ टक्के मतदान झालेपंढरपूर तालुक्यातील समाविष्ट असलेल्या ५७ गावांमध्ये उत्स्फूर्तपणे ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानवाढलेल्या टक्क्यांवर राष्ट्रवादी व भाजपने आपला दावा सांगितला

मोहन डावरे

पंढरपूर : बहुचर्चित माढा मतदारसंघात लोकसभेसाठी चुरशीने ६३ टक्के मतदान झाले असले तरी यामध्ये पंढरपूर तालुक्यातील समाविष्ट असलेल्या ५७ गावांमध्ये उत्स्फूर्तपणे ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे़ या वाढलेल्या टक्क्यांवर राष्ट्रवादी व भाजपने आपला दावा सांगितला आहे.

मात्र मतदानापूर्वी घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे काही प्रमाणात राष्ट्रवादी मागे पडेल, असे चित्र असताना प्रत्यक्ष मतदानावेळी मात्र नेत्यांचे आदेश डावलत राष्ट्रवादीलाच मतदारांनी भरभरून कौल दिल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे़ प्रत्यक्षात निकाल महिनाभरानंतर लागणार असला तरी विजयासाठी दावे, प्रतिदावे, पैज यामुळे मतदारसंघात खमंग चर्चा सुरू आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो़ मात्र यावेळी शरद पवार यांच्या नाट्यमय माघारीनंतर भाजपने आपली संपूर्ण ताकद लावत माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण, खटाव व पंढरपूर या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीसाठी फायद्याचे ठरणारे मातब्बर नेते, साखर कारखानदार यांनाच आपल्या पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान उभे केले़ त्यामुळे राज्यभर राष्ट्रवादीचा हा गड ढासळणार अशी चर्चा सुरू झाली़ शेवटपर्यंत पंतप्रधान, मुख्यमंत्री व राज्याच्या अर्ध्या मंत्रिमंडळाने माढा मतदारसंघात महत्त्वाच्या ठिकाणी सभा घेऊन भाजपच जिंकणार असे चित्र उभे करण्यात यश मिळविले होते.

राष्ट्रवादीनेही सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या या हल्ल्याला शिस्तबद्ध उत्तरे देत रामराजे निंबाळकर, अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप सोपल यांनी किल्ला लढवत ठेवला.

शेवटपर्यंत भाजपची हवा असणाºया या मतदारसंघात प्रचार संपल्यानंतर मात्र अनेक नेत्यांनी आपापल्या समर्थकांना दिलेले आदेश डावलत कार्यकर्त्यांनी विरोधात कौल दिल्याचे बोलले जात होते.

माढा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यात रोपळे, भाळवणी, भोसे व करकंब या चार झेडपी गटांचा समावेश आहे़ यामध्ये तालुकास्तरीय नेतृत्वाची बेरीज केल्यास भाजपचेच प्राबल्य दिसून येते.

मात्र प्रत्यक्षात करकंब गटातील करकंब गाव, रोपळे गटातील सुस्ते, तुंगतचा परिसर वगळला व भाळवणी गटातील फक्त भाळवणी हे एकमेव मोठे गाव सोडले तर इतर चारही झेडपी गटात घड्याळालाच कौल दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती़

एकत्र नेते अन् मोकळे कार्यकर्ते- काही गावांमध्ये भाजपनेही तालुकास्तरावरील एकत्र आलेल्या नेत्यांचा फायदा उठवत मताधिक्य घेण्याचा दावा केला आहे, तर अनेक गावांमध्ये निम्मी मते आम्हीच घेऊन, या ५७ गावांमध्ये सर्वाधिक मताधिक्य भाजपलाच मिळेल, असा दावा केला जात होता़ त्यामुळे प्रत्यक्षात मतमोजणीनंतर कोणाचा दावा खरा ठरणार हे स्पष्ट होईल़ नेते एकत्र आले असले तरी कार्यकर्ते मात्र मोकळेच असल्याचे चित्र होते.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानElectionनिवडणूकPoliticsराजकारण