विरोधकांचा अंदाज घेत उमेदवारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:57+5:302020-12-30T04:29:57+5:30

करण्याच्या पहिल्या दोन दिवसात केवळ २० अर्ज दाखल झाले होते. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी ...

Candidates filed anticipating opponents | विरोधकांचा अंदाज घेत उमेदवारी दाखल

विरोधकांचा अंदाज घेत उमेदवारी दाखल

करण्याच्या पहिल्या दोन दिवसात केवळ २० अर्ज दाखल झाले होते. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी असतानादेखील पाहिजे त्या प्रमाणात अर्ज दाखल झाले नाहीत दोन दिवस शिल्लक असताना विरोधकांचा अंदाज घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू आहे. सोमवारी ३३ गावांतील १४० उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांनी दिली.

सोमवारी वैराग ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. गावोगावच्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी केली होती. दिवसभर नेटवर्क स्लो असल्यामुळे कित्येकांनी रात्री उशिरापर्यंत थांबून अर्ज भरुन घेतले, मात्र प्रत्यक्षात अर्ज दाखल केले नाहीत. समोरच्या पॅनलकडून कोणाचा अर्ज दाखल होतो याचा अंदाज आल्यानंतरच आपला अर्ज दाखल करायचा, असा पवित्रा गावोगावच्या पॅनलप्रमुखांचा आहे.

या गावातून दाखल अर्ज

चारे येथून सर्वाधिक २० अर्ज दाखल झाले.

इर्लेवाडी ६, आळजापूर, दहिटणे, कव्हे, कासारवाडी, माळेगाव, नागोबाचीवाडी, सावरगाव १, बाभूळगाव, धामणगाव, बोरगाव, जामगाव, उपळाई २, भोईंजे, गाताचीवाडी, पिंपळगाव धस, यावली ३, धानोरे, घोळवेवाडी, सारोळे, शिराळे, शेलगाव व्हळे, तडवळे ६, कळंबवाडी, खांडवी ५, कासारी, वानेवाडी, वालवड ४, पांढरी ७, पिंपरी पा. ९, सासुरे ८, शेळगाव आर. १३

वैरागमधून एकही अर्ज नाही, नेतेमंडळींकडून चौकशी

वैरागची सर्वपक्षीय नेतेमंडळी लक्ष ठेवून वैराग ग्रामपंचायतीसाठी कोणीच अर्ज दाखल करायचा नाही, असे सर्वपक्षीय बैठकीत निश्चित केले. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी गोडावूनकडे कोणीच फिरकले नाही. तरी ही गावाला चुकवून कोणी अर्ज दाखल करेल, या भीतीपोटी सर्व प्रमुख गटाचे कार्यकर्ते या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपताच राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर, भाजपचे संतोष निंबाळकर, शिवसेनेचे अरुण सावंत, भाजपचे शहराध्यक्ष शिवाजी सुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून याबाबतची

माहिती घेतली.

Web Title: Candidates filed anticipating opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.