शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पाणीचोरी पकडणाऱ्या कालवा निरीक्षकाला शेतकऱ्याकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:27 IST

चिकमहूद येथील घटना; संबंधित शेतकऱ्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून कालव्यातून पाणीचोरी सुरूपाणीचोरी रोखण्यासाठी सांगोला तालुक्यात कालवा निरीक्षक अलर्टशेतकऱ्यांनी केलेली मारहाणीबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगोला : महूद - राजेवाडी कालवा क्र. २ वर अनाधिकृतरित्या टाकलेले सायपन जेसीबीने काढत असताना चिडलेल्या शेतकऱ्याने तुम्ही कालव्यावरील माझे सायपन का काढले असे म्हणून शिवीगाळी करीत गच्ची पकडून कालवा निरीक्षकाच्या श्रीमुखात लगावली. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास जाधववाडी ( चिक-महूद ता. सांगोला ) येथील कालवा क्र.२ वरील दार क्र. ४० जवळ घडली. 

याबाबत राजेवाडी कालवा निरीक्षक दत्तात्रय गणपत भाले (रा. बलवडी ता. सांगोला) यांनी फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी भाऊराव भीमराव जाधव (रा. जाधववाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजेवाडी तलावातून उन्हाळी हंगामातील शेती व फळ पिकांसाठी कालव्यातून लाभ क्षेत्रात आर्वतन सोडले आहे. दरम्यान चिकमहुद -जाधववाडी येथील भाऊराव जाधव यांनी हद्दीतून जाणाऱ्या कालवा क्र. २ वरील दार क्र. ४० वर सायपन टाकून पाण्याची चोरी केल्याचे कालवा निरीक्षक दत्तात्रय भाले यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ जेसीबीच्या साह्याने अनाधिकृतरित्या टाकलेले पाईप ( सायपन ) काढून टाकण्याचे शासकीय काम करीत असताना भाऊराव जाधव यांनी त्याठिकाणी येऊन तुम्ही कालव्यावरील माझे सायपन का काढून टाकले असे म्हणून कालवा निरीक्षक भाले यांना शिवीगाळी करून गच्ची पकडून त्यांच्या गालावर चापट मारून मुक्कामार दिल्याने ते जखमी झाले. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश पाटोळे करीत आहेत. 

नीरा उजवा कालवा मैल ९३ खाली व राजेवाडी कालव्यातून उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यात आले आहे, अशावेळी शेतकरी अनधिकृत पणे कालव्यावर सायपन टाकून पाण्याची चोरी करीत आहेत. पाटबंधारे अधिकारी अशा लोकांना पाण्याची चोरी करू नका म्हणून विरोध करीत असताना शेतक-याकडून अधिकाऱ्यावर हल्ले होत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीकपातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी