शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 3:43 PM

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.  प्रकाश आंबेडकर याचा प्रचार शिगेला

ठळक मुद्देअकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यंदा अकोल्यासह सोलापुरातून निवडणूक लढवित आहेतसोलापुरातून निवडणूक लढविण्याची त्यांची पहिलीच वेळ आहे. 

राकेश कदम 

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.  प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर आणि पुत्र सुजात आंबेडकर यांनी सोलापुरात तळ ठोकला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या अनुपस्थितीत प्रचाराचा किल्ला लढवित आहेत.  आंबेडकर हे आघाडीचे प्रमुख स्टार प्रचारक आहेत. सोलापुरातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते चार दिवस सोलापुरात होते. आता ते राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या प्रचार सभांना हजेरी लावत आहेत. 

प्रकाश आंबेडकरांसाठी जिल्ह्यातील आंबेडकरी विचारांचे सर्व गट एकत्र आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारी नेतेही एकत्र फिरत आहेत. शिवाय मुस्लिम आणि धनगर समाजातील काही नेतेही त्यांच्यासोबत आहेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदारांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे हे नेते सांगत आहेत. त्यामुळे या सर्व नेत्यांना एकसंघ ठेवण्याचे काम आंबेडकर कुटुंबातील सदस्य करीत आहेत. 

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर । व्हीबीएअकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यंदा अकोल्यासह सोलापुरातून निवडणूक लढवित आहेत. सोलापुरातून निवडणूक लढविण्याची त्यांची पहिलीच वेळ आहे. 

बंधू । आनंदराज आंबेडकरआनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आहेत. मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी पुकारलेल्या आंदोलनासह विविध सामाजिक आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदविला आहे. एक एप्रिलपासून ते सोलापूर मुक्कामी आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर ग्रामीण भागातील प्रचाराची जबाबदारी दिली आहे. पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या भागात त्यांनी बैठक घेतल्या आहेत.

मुलगा । सुजात आंबेडकरुसुजात आंबेडकर गेल्या चार वर्षांपासून विविध सामाजिक आंदोलनामध्ये सक्रिय आहेत़ अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच ते सोलापुरात आले होते. त्यांनी शहरातील विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या असून ग्रामीण आणि शहर भागात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत. आता शहरातील प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूकsolapur-pcसोलापूर